Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026
    Facebook Twitter
    Friday, September 18
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»निवडणूक»शहरातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी कटीबध्द – सभापती प्रा राम शिंदे  
    निवडणूक

    शहरातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी कटीबध्द – सभापती प्रा राम शिंदे  

    Samrudha NagarBy Samrudha NagarNovember 27, 2025
    Facebook WhatsApp Telegram Twitter

                समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – विरोधकांजवळील कर्जत जामखेडचे लोक आपल्याला सोडुन भारतीय जनता पक्षात का आले याचे उत्तर विरोधकाना देत येत नाही. त्यांनी त्याचे आत्मचिंतन करण्याची गरज  आहे. आम्ही शहरातील प्रत्येक घटकांचा सखोल अभ्यास करुन वचननामा प्रसिद्ध करत आहोत. त्यामुळे नगरपरिषदेच्या सत्तेत येताच आम्ही वचनाला बांधील राहुन शहरात विकासकामे मार्गी लावण्यासाठी कटीबध्द राहणार असल्याचे सभापती प्रा राम शिंदे यांनी जामखेड येथे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. 

    जामखेड नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून शहरातील महत्त्वाच्या प्रश्नात हात घालून सर्वसमावेशक ३१ प्रकारच्या योजना या वचननाम्यात प्रमुखाने घेतल्या आहेत . यावेळी सभापती प्रा राम शिंदे निवडणूक प्रभारी शेखर खरमाळे, जेष्मठ नेते मधुकर राळेभात, तालुकाध्यक्ष बापुसाहेब ढवळे, अमित चिंतामणी, संजय काशिद, डॉ भगवान मुरुमकर, सचिन घुले, काकासाहेब तापकीर, दत्ता वारे, प्रविण घुले, संतोष म्हेत्रे, अजय काशिद, सुंदरदास बिरंगळ, याच्यासह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

    भाजपाने जाहिर केलेल्या वचननाम्यात शहरासाठी शुद्ध पाणी पुरवठा,मलनिस्सारण योजना,रस्ते विकास प्रकल्प, घरकुल योजना,नमो उद्यान, व्यापारी संकुल, औद्योगिक वसाहत, बौध्दविहार, चौक सुशोभीकरण,महापुरुषांचे स्मारक,सुधारित शहर विकास आराखडा,वाहन तळ, पर्यावरणपूरक स्वच्छ व सुंदर जामखेड शहर,महिला बालकल्याण व आरोग्य विभाग, शहरासाठी रिंगरोड, नगरपरिषदेंतर्गत स्वतंत्र कृषी विभाग, वाड्या वस्त्यावर स्मशानभूमी,महिला बचत गटांना शाॅपिंग माॅल उभारणार,पर्यटन,ग्रामदैवतांचा जिर्णोद्धार,पांजरपोळ व कोंडवाडा उभारणार, सार्वजनिक शौचालये, शिक्षण व युवक सक्षमीकरण,सुसज्ज भाजीपाला बाजार उभारणार,नियमित विजपुरवठा.,स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षण, पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन, सामाजिक विकास आणि समता.,रोजगार व उद्योग विकास, सुरक्षा आणि सुव्यवस्था,आरोग्य आणि स्वच्छ जिवनशैली, आणि नागरिक सहभाग आणि जबाबदारी या प्रमुख मुद्दावर भाजपाने हात घातला आहे. तसा वचननामा सर्वसमावेशक तयार केल्याने भाजपाने निवडणूकीत आघाडी घेतली आहे. राज्यात भाजपाचे सरकार असल्याने जनतेने भाजपाला साथ द्यावी असे आवाहन जेष्ठ नेते मधुकरराव राळेभात यांनी केले.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढ : सभापती शरद कार्ले .

    April 10, 2026

    बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत नवीन ट्विस्ट.

    April 9, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    अहिल्यानगर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त.

    August 25, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.