Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    April 27, 2026

    जामखेड पंचायत समितीची आढावा बैठक; नागरिकांच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाहीच्या आ. रोहित पवारांच्या सूचना

    April 27, 2026

    जनगणना कामकाज प्रामाणिकपणे पार पाडा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

    April 24, 2026
    Facebook Twitter
    Thursday, April 30
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»ताज्या बातम्या»प्रांजल चिंतामणी यांचा दोन्ही पदावर राहण्याचा मार्ग मोकळा, मंत्रिमंडळाचा महत्वाचा निर्णय…
    ताज्या बातम्या

    प्रांजल चिंतामणी यांचा दोन्ही पदावर राहण्याचा मार्ग मोकळा, मंत्रिमंडळाचा महत्वाचा निर्णय…

    Samrudha NagarBy Samrudha NagarDecember 25, 2025
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    नगरपरिषद, नगरपंचायतीच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व व मतदानाचा अधिकार

    अधिनियमात सुधारणा; अध्यादेश काढण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

    प्रांजली चिंतामणी यांना होणार थेट फायदा

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – दि २५

    नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व तसेच मतदानाचा अधिकार देण्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. यासाठी अध्यादेश काढण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

    या निर्णयाचा थेट फायदा जामखेड नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रांजली चिंतामणी यांना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जामखेड नगरपरिषदेमध्ये प्रांजली चिंतामणी या थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षा असून, त्या प्रभाग क्रमांक ४ (ब) मधून नगरसेवक म्हणूनही निवडून आल्या आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर येणाऱ्या अध्यादेशात दोन्ही पदे कायम ठेवण्याची तरतूद असल्यास, त्यांच्याकडे नगराध्यक्षा व नगरसेवक या दोन्ही पदांचा कार्यभार कायम राहण्याची शक्यता आहे.

    नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत प्रांजली चिंतामणी यांनी तब्बल ३,६८२ मतांनी विजय मिळवला आहे. याशिवाय त्या प्रभाग ४ (ब) मधून नगरसेवक म्हणूनही निवडून आल्याने, या अध्यादेशाचा सरळ आणि प्रत्यक्ष लाभ त्यांना होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

    सध्याच्या कायद्यानुसार, नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये अध्यक्ष म्हणून निवडून येण्यास पात्र असलेली व्यक्ती सदस्य म्हणूनही निवडून येऊ शकते. त्यामुळे एकाच व्यक्तीला अध्यक्ष व सदस्य या दोन्ही पदांसाठी जनतेचा स्पष्ट जनादेश मिळत असतो. मात्र सदस्यांमधून निवडून आलेला अध्यक्ष सदस्य म्हणून कायम राहत असताना, थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व व मतदानाचा अधिकार नसल्याने प्रशासकीय व निर्णयप्रक्रियेत विसंगती निर्माण होत होती.

    या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या सुधारणेनुसार, थेट निवडून आलेला अध्यक्ष एकाच वेळी अध्यक्ष व सदस्य अशी दोन्ही पदे धारण करू शकणार आहे. तसेच अध्यक्षास सदस्य म्हणून एक मत देण्याचा अधिकार मिळणार असून, मतदानात मतांची बरोबरी झाल्यास अध्यक्षाचा निर्णायक मताचा अधिकार पूर्वीप्रमाणे कायम राहणार आहे.

    या सुधारणांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकशाही प्रक्रिया अधिक बळकट होईल, तसेच थेट निवडून आलेल्या अध्यक्षाच्या भूमिकेला कायदेशीर स्पष्टता मिळेल, असा सरकारचा विश्वास आहे.

    चौकट

    सभापती प्रा. राम शिंदे यांची सोशल मीडिया पोस्ट

    जामखेड नगरपरिषदेमध्ये प्रांजली चिंतामणी या थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षा असून त्या प्रभाग ४ (ब) मधून नगरसेवक म्हणूनही निवडून आल्या आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा त्यांना होणार असल्याचे स्पष्ट आहे. या निर्णयाबाबत विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत समाधान व्यक्त केले आहे.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    April 27, 2026

    बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत नवीन ट्विस्ट.

    April 9, 2026

    शिवरायांवरील वक्तव्याचा मुद्दा पुन्हा पेटला; छिंदमला सभागृहाबाहेर हाकलले

    March 27, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    April 27, 2026

    जामखेड पंचायत समितीची आढावा बैठक; नागरिकांच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाहीच्या आ. रोहित पवारांच्या सूचना

    April 27, 2026

    जनगणना कामकाज प्रामाणिकपणे पार पाडा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

    April 24, 2026

    जिल्ह्यात बालविवाहाविरोधात प्रशासनाची मोठी कारवाई.

    April 19, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.