Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026
    Facebook Twitter
    Friday, September 18
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»ताज्या बातम्या»शिवरायांवरील वक्तव्याचा मुद्दा पुन्हा पेटला; छिंदमला सभागृहाबाहेर हाकलले
    ताज्या बातम्या

    शिवरायांवरील वक्तव्याचा मुद्दा पुन्हा पेटला; छिंदमला सभागृहाबाहेर हाकलले

    Samrudha NagarBy Samrudha NagarMarch 27, 2026
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    शिवरायांवरील वक्तव्याचा मुद्दा पुन्हा पेटला; छिंदमला सभागृहाबाहेर हाकलले


    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर
    काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेल्या नगरसेवक श्रीपाद छिंदम याच्याविरुद्ध अहिल्यानगरकरांचा संताप आज पुन्हा एकदा उफाळून आला. आज अहिल्यानगर महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू असताना छिंदम याला सभागृहाबाहेर काढण्याची जोरदार मागणी नगरसेवकांनी केली.


    सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही गटांतील नगरसेवक या मुद्द्यावर आक्रमक झाले होते. काही नगरसेवकांनी थेट छिंदम याच्या आसनाजवळ जाऊन त्याचा घेराव घातला. घोषणाबाजी करत त्याला सभागृहाबाहेर जाण्यास सांगण्यात आले.


    महापौर ज्योती गाडे आणि आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडेही नगरसेवकांनी छिंदम याला तात्काळ बाहेर काढण्याची मागणी केली. “शिवद्रोही व्यक्तीसोबत आम्ही सभागृहात बसणार नाही. त्याच्याविरोधात ठराव करावा, अन्यथा आम्ही सभात्याग करू,” अशी ठाम भूमिका नगरसेवकांनी घेतली.


    राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संपत बारस्कर यांच्यासह सर्वच नगरसेवकांनी या मागणीसाठी पुढाकार घेतला. काही नगरसेवकांनी छिंदम याच्या समोरील माईक काढून घेत त्याला थेट सभागृहाच्या दरवाजापर्यंत नेले आणि बाहेर काढले. त्यानंतरच सभागृहाचे कामकाज सुरू झाले.


    छिंदम याने यापूर्वी शिवरायांचा अवमान केल्याप्रकरणी त्यावेळी तो उपमहापौर असताना त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आणि नगरसेवकपदही रद्द करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही तो दोन वेळा निवडून आला असून सध्या तो बहुजन समाज पक्षाकडून नगरसेवक आहे.


    दरम्यान, आजच्या घटनेदरम्यान छिंदम हा लोकशाहीचा दाखला देत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होता; मात्र संतप्त नगरसेवकांसमोर त्याचा युक्तिवाद टिकू शकला नाही.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढ : सभापती शरद कार्ले .

    April 10, 2026

    बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत नवीन ट्विस्ट.

    April 9, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    अहिल्यानगर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त.

    August 25, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.