सर्वसामान्य कुटुंबातील नगरसेविकेला विक्रमी मताधिक्याने निवडून देण्याची ताकद फक्त भाजपकडे – नंदा होळकर
समृद्धी नगर न्यूज नेटवर्क दि २९ –
जामखेड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ७ मधून सभापती प्रा राम शिंदे यांनी सर्वसामान्य कुटुंब असलेले होळकर यांना उमेदवारी देऊन निवडून आणले आहे. त्यामुळे सर्व सामान्य कुटुंबातून राजकारणात प्रवेश केलेल्या नंदा प्रविण होळकर यांनी तब्बल ९१० मतांच्या विक्रमी फरकाने दणदणीत विजय मिळवून जामखेडच्या राजकारणात नवा अध्याय लिहिला आहे. महिलांमध्ये ४८८ मतांचे सर्वाधिक मताधिक्य मिळवत त्यांनी मोठा विजय मिळविला आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबाला उमेदवारी देऊन निवडून आणण्याची ताकद फक्त भाजपकडे असल्नंयाचे नवनिर्दावाचित नगरसेविका नंदा होळकर यांनी समृद्ध नगर न्यूज नेटवर्क दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.
हा विजय केवळ आकड्यांचा नसून, तो शांत, संयमी पण ठाम विकासाभिमुख नेतृत्वावर मतदारांनी दिलेला कौल आहे. प्रचाराच्या संपूर्ण कालावधीत नंदा होळकर यांनी व्यक्तिगत टीकेपासून दूर राहून विकास, मूलभूत सुविधा, स्वच्छता, महिला सक्षमीकरण व तरुणांसाठी संधी या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले. त्याचा थेट फायदा मतदानातून दिसून आला.

विशेषतः महिला मतदार, तरुण वर्ग तसेच स्वराज प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी एकसंघपणे दिलेला पाठिंबा या विजयामागील प्रमुख कारण ठरला. “आपल्यातीलच एक” अशी ओळख नंदा होळकर यांनी निर्माण केल्यामुळे प्रभागातील प्रत्येक घटकाने त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणे पसंत केले.

नंदा होळकर यांचे पती प्रविण होळकर हे भारतीय जनता पक्षाच्या जामखेड शहर मंडलचे उपाध्यक्ष म्हणून दीर्घकाळ संघटनात्मक जबाबदारी सांभाळत आहेत. बूथ पातळीपासून प्रभाग पातळीपर्यंत पक्ष मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेल्या कामाचे प्रतिबिंब या निकालात स्पष्टपणे दिसून आले. पक्षाशी एकनिष्ठ राहून विचार व ध्येयधोरणे प्रभावीपणे राबविल्याचे हे ठोस फलित असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती मा. प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षश्रेष्ठींनी नंदा होळकर यांच्यावर दाखविलेला विश्वास या निकालाने पूर्णपणे सार्थ ठरविला. प्रभाग क्रमांक ७ मध्ये भाजपची संघटनात्मक ताकद आणि मतदारांमधील विश्वास या विजयामुळे आणखी बळकट झाला आहे.
प्रभागातील नागरिकांच्या प्रश्नांवर संयमाने, थेट आणि सकारात्मक भूमिका घेणारे नेतृत्व म्हणून प्रविण होळकर यांची ओळख आहे. याच विश्वासातून मतदारांनी त्यांच्या सौभाग्यवती नंदा होळकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले. या निकालामुळे विरोधकांच्या रणनीतीला मोठा धक्का बसला असून भाजपचा जनाधार अधिक दृढ झाला आहे.
