Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026
    Facebook Twitter
    Friday, September 18
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»Uncategorized»कांद्याच्या पिकाच्या आड अफूची शेती! बांधखडक येथे पोलिसांचा छापा; ६ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त २ जणांविरोधात गुन्हा
    Uncategorized

    कांद्याच्या पिकाच्या आड अफूची शेती! बांधखडक येथे पोलिसांचा छापा; ६ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त २ जणांविरोधात गुन्हा

    Samrudha NagarBy Samrudha NagarMarch 12, 2026
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क :
    कर्जत तालुक्यातील चापडगाव येथे अफूच्या शेतीवर पोलिसांनी कारवाई केल्याची घटना ताजी असतानाच जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील बांधखडक शिवारात कांद्याच्या पिकाच्या आडोशाला प्रतिबंधित अफूची शेती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खर्डा पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल ६ लाख १७ हजार ७२५ रुपये किमतीची अफूची झाडे जप्त करण्यात आली असून या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड तालुक्यातील बांधखडक येथील शेत गट क्रमांक १९१ व १९२ मध्ये सुधाकर एकनाथ वारे व मारुती विश्वनाथ वारे यांनी कांद्याच्या पिकाच्या आडोशाने प्रतिबंधित अफूची लागवड केली होती. या ठिकाणी सुमारे २२ किलोहून अधिक अफूची झाडे उगवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

    याबाबतची माहिती खर्डा पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार आणि उपविभागीय अधिकारी प्रविणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. सरकारी व खासगी वाहनांमधून पथक घटनास्थळी दाखल होत अचानक छापा टाकण्यात आला.

    छाप्यामध्ये कांद्याच्या पिकामध्ये लपवून ठेवलेली अफूची झाडे आढळून आली. आरोपींनी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून या झाडांना खते व पाणी देऊन त्यांचे संगोपन केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
    या कारवाईदरम्यान पोलिसांनी २२ किलो ५६१ ग्रॅम वजनाची अफूची झाडे जप्त केली असून त्यांची अंदाजे किंमत ६ लाख १७ हजार ७२५ रुपये इतकी असल्याचे स्पष्ट करण्यात आले. कर्जत विभागाच्या फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देत आवश्यक पुरावे संकलित केले आहेत.

    या प्रकरणी पोलीस हवालदार संदीप धामणे यांच्या फिर्यादीवरून बांधखडक येथील सुधाकर एकनाथ वारे व मारुती विश्वनाथ वारे यांच्याविरोधात खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंग राजपूत करीत आहेत.
    दरम्यान, तालुक्यात शेतीच्या आडून प्रतिबंधित अफूची लागवड होत असल्याचा प्रकार उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून अशा बेकायदेशीर प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

    सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय अधिकारी प्रविणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंग राजपूत, संभाजी शेंडे, संदीप धामणे, गोकुळ इंगवले, प्रविण थोरात, विष्णु आवारे, धनराज बिराजदार, शाम चखाले, बाळू खाडे, अशोक बडे, शशी म्हस्के, मुन्ना शेख, चालक शकिल बेग व संजय गुंड यांच्या पथकाने केली.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    अहिल्यानगर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त.

    August 25, 2026

    शेतीसाठी आता 12 फुटांचा रुंद शेतरस्ते अनिवार्य.ट्रॅक्टर, ट्रॉली, हार्वेस्टरची वाहतूक सुलभ; गावोगावी शेतमार्ग होणार सुरक्षित व दर्जेदार

    January 27, 2026

    जामखेड–सौतडा महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करा. अन्यथा आंदोलन.

    January 5, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    अहिल्यानगर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त.

    August 25, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.