Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील १६.९६ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

    July 24, 2026

    जामखेड येथे ‘साई समर्थ हाडांचा दवाखाना व एम.आर.आय. सेंटर’चा २ ऑगस्ट रोजी शुभारंभ

    July 24, 2026

    राजेंद्र पवार यांचे शेती व शेतकऱ्यांसाठीचे कार्य प्रेरणादायी – केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

    July 19, 2026
    Facebook Twitter
    Thursday, July 30
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»महाराष्ट्र»हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढ : सभापती शरद कार्ले .
    महाराष्ट्र

    हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढ : सभापती शरद कार्ले .

    Samrudha NagarBy Samrudha NagarApril 10, 2026
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क : रबी हंगाम 2025-26 साठी हरभरा खरेदी प्रक्रियेला वेग देण्यासाठी शासनाने ऑनलाईन नोंदणीची मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांनी करावयाची ऑनलाईन नोंदणी आता १५ एप्रिल २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

    पूर्वी ही मुदत ३१ मार्चपर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र, सध्याचे बाजारभाव, शेतकऱ्यांची स्थिती तसेच नाफेडच्या विनंतीचा विचार करून शासनाने ही मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे उशिरा काढणी झालेल्या किंवा अद्याप नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

    शासनाने हरभऱ्यासाठी ५,८५० रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव जाहीर केला असून, या दराने खरेदी केली जाणार आहे. बाजारातील दरात होणाऱ्या चढ-उतारांपासून संरक्षण मिळावे आणि शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत मिळावी, हा यामागील उद्देश आहे.

     बाजार समितीचे सभापती शरद कार्ले म्हणाले की, “हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत लाभदायक आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ऑनलाईन नोंदणी केलेली नाही, त्यांनी विलंब न करता नोंदणी पूर्ण करावी. नोंदणी केल्याशिवाय हमीभावाने खरेदीचा लाभ मिळणार नाही, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.”तसेच, नोंदणी करताना आवश्यक कागदपत्रे अचूक सादर करावीत, जेणेकरून पुढील प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

    शासनाच्या या निर्णयामुळे तालुक्यातील  मोठ्या संख्येने हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, हमीभाव योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    राजेंद्र पवार यांचे शेती व शेतकऱ्यांसाठीचे कार्य प्रेरणादायी – केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

    July 19, 2026

    बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत नवीन ट्विस्ट.

    April 9, 2026

    शिवरायांवरील वक्तव्याचा मुद्दा पुन्हा पेटला; छिंदमला सभागृहाबाहेर हाकलले

    March 27, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील १६.९६ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

    July 24, 2026

    जामखेड येथे ‘साई समर्थ हाडांचा दवाखाना व एम.आर.आय. सेंटर’चा २ ऑगस्ट रोजी शुभारंभ

    July 24, 2026

    राजेंद्र पवार यांचे शेती व शेतकऱ्यांसाठीचे कार्य प्रेरणादायी – केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

    July 19, 2026

    मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद; दरोड्यासह १० गुन्ह्यांची उकल

    July 15, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.