Close Menu

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    दुष्काळी आढावा बैठक; टंचाई निवारणासाठी सूक्ष्म नियोजनाच्या सूचना

    November 28, 2026

    नान्नज दरोड्याचा छडा; पाच जण ताब्यात

    October 8, 2026

    दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाने गावोगावी जाऊन काम करावे; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

    October 1, 2026
    Facebook X (Twitter)
    Saturday, November 28
    Facebook X (Twitter) Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»महाराष्ट्र»दुष्काळी आढावा बैठक; टंचाई निवारणासाठी सूक्ष्म नियोजनाच्या सूचना
    महाराष्ट्र

    दुष्काळी आढावा बैठक; टंचाई निवारणासाठी सूक्ष्म नियोजनाच्या सूचना

    Samrudha NagarBy Samrudha NagarNovember 28, 2026
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    दुष्काळी आढावा बैठक; टंचाई निवारणासाठी सूक्ष्म नियोजनाच्या सूचना

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क-

    अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयजिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन करून टंचाई निवारणाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय दुष्काळी आढावा बैठकीत देण्यात आल्या.

    जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस उपस्थित राहून लोकप्रतिनिधींनी पाणीटंचाई निवारणासाठी विविध महत्त्वपूर्ण सूचना केल्या. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे, पाणीपुरवठा योजनांची सद्यस्थिती तपासणे, आवश्यक दुरुस्ती करणे तसेच पर्यायी पाणीस्रोतांचे नियोजन करण्यावर भर देण्यात आला.

    राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाकडून टंचाई निवारणासाठी घेतले जाणारे निर्णय, उपलब्ध सुविधा आणि राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न लक्षात घेता हायड्रोपोनिक चारा निर्मितीसारख्या पर्यायी उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

    या बैठकीस आमदार सुनील कर्जतकर, विठ्ठल लंघे, काशिनाथ दाते, मोनिका राजळे, अक्षय कर्डिले, सभापती प्रा. राम शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार प्राजक्त तनपुरे, विक्रम पाचपुते आणि हेमंत ओगले सहभागी झाले होते.

    दुष्काळी परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या समन्वयातून प्रत्येक गावापर्यंत टंचाई निवारणाच्या उपाययोजना पोहोचविण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली.

    चौकट

    दुष्काळी उपाययोजनांच्या अंमलबजावणीकडे लक्षदुष्काळी परिस्थितीचा आढावा, पाणीपुरवठ्याचे नियोजन आणि चारा उपलब्धतेबाबत बैठकीत चर्चा झाली. मात्र, या बैठकीत झालेल्या सूचना आणि निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत होते, तसेच टंचाईग्रस्त गावांतील नागरिकांना पाणी आणि जनावरांना चारा वेळेत उपलब्ध होतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    राजेंद्र पवार यांचे शेती व शेतकऱ्यांसाठीचे कार्य प्रेरणादायी – केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

    July 19, 2026

    हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढ : सभापती शरद कार्ले .

    April 10, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    दुष्काळी आढावा बैठक; टंचाई निवारणासाठी सूक्ष्म नियोजनाच्या सूचना

    November 28, 2026

    नान्नज दरोड्याचा छडा; पाच जण ताब्यात

    October 8, 2026

    दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाने गावोगावी जाऊन काम करावे; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

    October 1, 2026

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.