Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026
    Facebook Twitter
    Friday, September 18
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»ताज्या बातम्या»गौणखनिज स्वामित्व वसुली प्रकरणे प्रलंबित ठेवू नयेत – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
    ताज्या बातम्या

    गौणखनिज स्वामित्व वसुली प्रकरणे प्रलंबित ठेवू नयेत – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

    Samrudha NagarBy Samrudha NagarMay 24, 2025
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    गौणखनिज स्वामित्व वसुली प्रकरणे प्रलंबित ठेवू नयेत

    महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

    विभागीय आयुक्त कार्यालयात महसूल, नोंदणी व मुद्रांकसह भूमिअभिलेख विभागाचा घेतला आढावा

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क नाशिक दि. २४ :  गौण खनिज स्वामित्व वसुली प्रकरणे प्रलंबित ठेवू नयेत. पाणंद रस्ते मुक्त करीत शेतकऱ्यांना रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिल्या.

    विभागीय आयुक्त कार्यालयात आज सकाळी मंत्री श्री. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, व उपविभागीय अधिकारी यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा (नाशिक), डॉ. पंकज आशिया (अहिल्यानगर), आयुष प्रसाद (जळगाव), जितेंद्र पापळकर (धुळे), मिताली सेठी (नंदुरबार) उपस्थित होते. यावेळी मंत्री श्री. बावनकुळे यांच्या हस्ते निफाड तालुक्यातील दोन लाभार्थ्यांना घरकूल  बांधण्यासाठी वाळूच्या मोफत पासचे वितरण करण्यात आले. तसेच 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात यशस्वी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.  त्यात उपविभागीय अधिकारी नितीन मुंडवारे (अमळनेर, जि. जळगाव), शरद मंडलिक (शिरपूर, जि. धुळे), आप्पासाहेब शिंदे (दिंडोरी, जि. नाशिक), तहसीलदार नानासाहेब आगळे (जामनेर, जि. जळगाव), अमोल मोरे (राहता, जि. अहिल्यानगर), महेंद्र माळी (शिरपूर, जि. धुळे) यांचा समावेश आहे.

    मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प केला आहे. समाजाच्या शेवटच्या घटकासाठी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्व मिळून काम करावयाचे आहे.त्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक आहे. घरकुलांच्या बांधकामासाठी वाळूच्या उपलब्धतेसाठी आपापल्या जिल्ह्यातील नदी, नाल्यातील वाळूचे सर्वेक्षण करतानाच एम. सॅन्ड वाळूचे उत्पादन आणि वापरास प्रोत्साहन द्यावे.

    आयुक्त डॉ. गेडाम यांनी महसूल विभागातर्फे नाशिक विभागात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. नाशिक विभागात पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. विभागाची लोकसंख्या १ कोटी ९० लाख एवढी आहे. विभागाची महसूल वसुली १०७ टक्के झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. आशिया, श्री. शर्मा, श्रीमती सेठी, श्री. प्रसाद, श्री. पापळकर यांनी विविध सूचना केल्या

    नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कामकाजाचा मंत्री बावनकुळे यांनी घेतला आढावा

    मंत्री श्री. बावनकुळे यांनी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा आढावा घेतला. नोंदणी महानिरिक्षक रवींद्र बिलवडे दुरुदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

    मंत्री श्री. बावनकुळे यांनी सांगितले की, दस्त नोंदणी अधिकाधिक सुलभ होईल, असे नियोजन करावे. जिल्हाधिकारी यांनी नोंदणी विभागाचा दरमहा आढावा घ्यावा. त्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाने प्रमाण कार्यपद्धती तयार करावी. तसेच एक जिल्हा एक नोंदणीबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करावी, असेही त्यांनी सांगितले.

    यावेळी १०० दिवसांचा सुधारणा कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नोंदणी महानिरीक्षक कार्यालयांतर्गत स्नेहलता पाटील (दुय्यम निबंधक कार्यालय जळगाव क्र. २), सतीश कोकरे, दुय्यम निबंधक कार्यालय, सिन्नर, रुपेश चेनुकर, दुय्यम निबंधक कार्यालय,जळगाव क्र.३ यांचा मंत्री श्री. बावनकुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

    मंत्री बावनकुळे यांनी घेतला भूमी अभिलेख विभागाचा आढावा

    मंत्री श्री. बावनकुळे यांनी भूमी अभिलेख विभागाचा आढावा घेतला. यावेळी जमाबंदी आयुक्त आनंद भंडारी आणि भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक महेश इंगळे यांनी विभागाची माहिती दिली.यावेळी मंत्री श्री. बावनकुळे यांनी सांगितले की, तक्रार रहित विभाग निर्मितीवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भर दिला पाहिजे. यावेळी पाचही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी विविध सूचना केल्या१०० दिवसांचा सुधारणा कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल भूमी अभिलेख कार्यालयातील शीतल लेकुरवाळे (जामनेर), नंदा बहिरम (पेठ, जि. नाशिक), कुंदन परदेशी (साक्री) यांचा मंत्री श्री. बावनकुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    तुकाई उपसा जलसिंचन योजनेचे काम १५ जुलैपर्यंत पूर्ण करा; भैरवनाथ योजनेचा प्रस्ताव ऑगस्टअखेर सादर करा : सभापती प्रा. राम शिंदे

    June 17, 2026

    सभापती प्रा राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश, ₹ 300 कोटींचा निधी मंजूर.

    May 23, 2026

    जामखेड पंचायत समितीची आढावा बैठक; नागरिकांच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाहीच्या आ. रोहित पवारांच्या सूचना

    April 27, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    अहिल्यानगर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त.

    August 25, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.