Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026
    Facebook Twitter
    Friday, September 18
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»क्राईम/ गुन्हेगारी»पुण्यातील घायवळ टोळीचे दोन फरार आरोपी जेरबंद; 
    क्राईम/ गुन्हेगारी

    पुण्यातील घायवळ टोळीचे दोन फरार आरोपी जेरबंद; 

    Samrudha NagarBy Samrudha NagarJune 22, 2026
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    पुण्यातील घायवळ टोळीचे दोन फरार आरोपी जेरबंद; 

    जामखेड मधील गुन्ह्यातील एक आरोपी अटक , अहिल्यानगर एलसीबीची धडक कारवाई

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – 

    पुण्यातील कुख्यात घायवळ टोळीशी संबंधित आणि मोक्का कायद्यांतर्गत दाखल गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या दोन आरोपींना अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अटक केली आहे. रोहित उर्फ बबलू बाबासाहेब गोलेकर (वय २७, रा. खर्डा, ता. जामखेड) याला कोल्हापूर जिल्ह्यातून, तर ज्ञानेश्वर उर्फ माऊली दगडू तोंडे (वय ४०, रा. खेचरे, ता. मुळशी, जि. पुणे) याला अहिल्यानगर जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले.

    खर्डा येथील विजयसिंह कल्याणराव गोलेकर (वय ४५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी रोहित गोलेकर याने व्हॉट्सअॅप कॉलद्वारे २० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. “पुण्यातील संघटित गुन्हेगारीच्या प्रकरणात तू मला वाचवले नाहीस. त्यामुळे माझे नुकसान झाले,” असे सांगत खंडणी न दिल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी खर्डा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली एलसीबीचे पथक आरोपींचा शोध घेत होते. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे रोहित गोलेकर हा कोल्हापूर जिल्ह्यातील यड्राव फाटा परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार २१ जून रोजी सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    तपासादरम्यान रोहित गोलेकर हा पुणे शहरातील वारजे माळवाडी आणि कोथरूड पोलिस ठाण्यांत दाखल मोक्का कायद्यांतर्गत गुन्ह्यांमध्येही फरार असल्याचे उघड झाले.

    दरम्यान, कोथरूड पोलिस ठाण्याच्या अभिलेखावरील फरार आरोपी ज्ञानेश्वर उर्फ माऊली तोंडे हा मिरजगाव परिसरातील सोलापूर-अहिल्यानगर महामार्गावरील उड्डाणपुलाखाली थांबलेला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्धही मोक्का आणि शस्त्र कायद्यासह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.

    पोलीस नोंदीनुसार रोहित गोलेकर याच्याविरुद्ध सात, तर ज्ञानेश्वर तोंडे याच्याविरुद्ध सहा गुन्हे दाखल आहेत. दोघेही पुण्यातील कुख्यात घायवळ टोळीशी संबंधित असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

    अटक करण्यात आलेला रोहित गोलेकर याला पुढील तपासासाठी खर्डा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, ज्ञानेश्वर तोंडे याला पुणे शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद; दरोड्यासह १० गुन्ह्यांची उकल

    July 15, 2026

    अवैध सावकारांवर धडक कारवाई करा; तक्रारी तातडीने निकाली काढा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

    February 18, 2026

    शाळा-कॉलेज सुटल्यानंतर मुलींना छेडछाडीचा त्रास; श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जामखेड पोलिसांकडे निवेदन.

    January 2, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    अहिल्यानगर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त.

    August 25, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.