Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026
    Facebook Twitter
    Friday, September 18
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»क्राईम/ गुन्हेगारी»शाळा-कॉलेज सुटल्यानंतर मुलींना छेडछाडीचा त्रास; श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जामखेड पोलिसांकडे निवेदन.
    क्राईम/ गुन्हेगारी

    शाळा-कॉलेज सुटल्यानंतर मुलींना छेडछाडीचा त्रास; श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जामखेड पोलिसांकडे निवेदन.

    Samrudha NagarBy Samrudha NagarJanuary 2, 2026
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    शाळा-कॉलेज सुटल्यानंतर मुलींना छेडछाडीचा त्रास; श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जामखेड पोलिसांकडे निवेदन


    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क दि 2


    जामखेड शहरात शाळा व महाविद्यालय सुटल्यानंतर मुलींना छेडछाडीचा व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याच्या घटना वाढत असून, याबाबत तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुराजे मधुकर भोसले यांनी जामखेड पोलीस स्टेशनकडे निवेदनाद्वारे केली आहे.


    निवेदनात म्हटले आहे की, शहरातील शाळा-महाविद्यालय परिसर, कॉलेज रोड, चौक, तहसील कार्यालय परिसर तसेच बसस्थानक परिसरात काही टवाळखोर युवक मोटारसायकल वेगात चालवणे, मुलींना कट मारणे, हार्न वाजवणे, हातवारे करणे, अश्लील टोमणे मारणे अशा प्रकारे खुलेआम छेडछाड करत आहेत. अलीकडेच जामखेड बसस्थानक परिसरात मुलींना छेडछाडीचा प्रकार घडल्याने विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


    सकाळी सुमारे सात वाजल्यापासून महाविद्यालय सुरू होत असल्याने त्या वेळेस नागरिकांची वर्दळ कमी असते. याचाच गैरफायदा काही समाजकंटक युवक घेत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकारांमुळे पालकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून, भविष्यात बाहेरगावाहून शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.


    या पार्श्वभूमीवर शाळा व महाविद्यालय सुटण्याच्या वेळेस विशेष पोलीस पथक नियुक्त करावे, बसस्थानक व प्रमुख ठिकाणी गस्त वाढवावी, तसेच अशा टवाळखोर युवकांवर तात्काळ व कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गरज भासल्यास विशेष मोहिम राबविण्याचीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
    योग्य ती व तात्काळ कारवाई न झाल्यास भविष्यात घडणाऱ्या गंभीर घटनेस पोलीस प्रशासन जबाबदार राहील, अशी स्पष्ट भूमिका निवेदनात मांडण्यात आली आहे.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद; दरोड्यासह १० गुन्ह्यांची उकल

    July 15, 2026

    पुण्यातील घायवळ टोळीचे दोन फरार आरोपी जेरबंद; 

    June 22, 2026

    बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत नवीन ट्विस्ट.

    April 9, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    अहिल्यानगर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त.

    August 25, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.