Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026
    Facebook Twitter
    Friday, September 18
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»राष्ट्रीय»वाराणसीतील मणिकर्णिका घाटावरील ऐतिहासिक मंदिरे तोडल्याच्या निषेधार्थ जामखेड येथे निवेदन.
    राष्ट्रीय

    वाराणसीतील मणिकर्णिका घाटावरील ऐतिहासिक मंदिरे तोडल्याच्या निषेधार्थ जामखेड येथे निवेदन.

    Samrudha NagarBy Samrudha NagarJanuary 16, 2026
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    वाराणसीतील मणिकर्णिका घाटावरील ऐतिहासिक मंदिरे तोडल्याच्या निषेधार्थ जामखेड येथे निवेदन


    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – :
    वाराणसी येथील गंगा नदीच्या काठावर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या मणिकर्णिका घाटावरील मंदिरे व ऐतिहासिक वास्तू विकासाच्या नावाखाली तोडण्यात आल्याच्या घटनेचा जामखेड येथे निषेध करण्यात आला. या संदर्भात तहसील कार्यालयात तहसीलदारांना निषेध निवेदन देण्यात आले.


    निवेदनात नमूद करण्यात आले की, मणिकर्णिका घाटावरील मंदिरे व वास्तू या भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहेत. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेली ही मंदिरे श्रद्धा, परंपरा व इतिहासाचे प्रतीक असून शेकडो वर्षांपासून भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र राहिली आहेत.


    सध्या सुरू असलेल्या सुधारणा व विकासकामांच्या नावाखाली या प्राचीन वास्तूंची तोड करण्यात येत असल्याची माहिती समोर आली असून, ही बाब दुर्दैवी असल्याचे निवेदनात म्हटले आहे. विकासाच्या प्रक्रियेत ऐतिहासिक व धार्मिक वारशाचे जतन करणे आवश्यक असताना, त्याची तोडफोड होणे योग्य नसल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.


    सदर प्रकाराची तात्काळ दखल घेऊन मणिकर्णिका घाटावरील तोड थांबवावी तसेच राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या सर्व मंदिरे व ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण करावे, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.


    यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुराजे भोसले यांच्यासह शरद फरांडे, पांडुरंग माने, भैय्या खरात, नितीन राऊत, ऋषिकेश सोनवणे, संजय खरात, मनीष मासाळ, सचिन काशिद, नितीन खेत्रे, आदित्य थोरात, नाना इंगळे, भाऊ पोटफोडे, आदित्य राजगुरू, संतोष शिंदे, मनोज राळेभात, अनिल बिराजदार, महारुद्र नागरगोजे व धारकरी बंधू उपस्थित होते.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    डॉ. हृतिक घोलप एम.डी. (बालरोग) साठी नागपूरमध्ये प्रवेश

    February 20, 2026

    समाजकल्याण वसतीगृहातील माजी विद्यार्थ्याची तालुका कृषी अधिकारी पदावर निवड

    February 12, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    अहिल्यानगर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त.

    August 25, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.