Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026
    Facebook Twitter
    Friday, September 18
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»महाराष्ट्र»कॉपीला प्रोत्साहन देणाऱ्यांवर कारवाई करा- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
    महाराष्ट्र

    कॉपीला प्रोत्साहन देणाऱ्यांवर कारवाई करा- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

    Samrudha NagarBy Samrudha NagarFebruary 13, 2025
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    कॉपीला प्रोत्साहन देणाऱ्यांवर कारवाई करा- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

    वॉररूमच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडून  हजार परीक्षा केंद्रांची पाहणी

    समृध्द नगर न्यूज नेटवर्क अहिल्यानगर दि. १३– जिल्ह्यात इयत्ता बारावीची परीक्षा शांततेत, सुरळीत व कॉपीमुक्त कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणात व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संकल्पनेतील ‘आनंददायी परीक्षा पॅटर्न’ अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात वॉररूम स्थापन करण्यात आली आहे. या वॉररुमच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: सुमारे एक हजारपेक्षा अधिक केंद्रांची पाहणी करत पर्यवेक्षणाबाबत विविध सूचना केल्या. नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाईचे प्रस्ताव तयार करण्याबरोबरच परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले.

         संवेदनशील केंद्रांसह सर्वच केंद्रांच्या विविध ब्लॉक मधील थेट दृश्याद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रातील व्यवस्थेचा आढावा घेतला.   इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे वॉररूमच्या माध्यमातून मॉनिटरिंग करण्यात येत आहे.  जिल्ह्यातील १४ तालुके व अहिल्यानगर शहरातील १०९ पेक्षा अधिक परीक्षा केंद्रांच्या माध्यमातून सुमारे एक हजारपेक्षा अधिक ब्लॉकवर गुगलमीट, ड्रोन कॅमेरा, सीसीटीव्ही व केंद्र संचालकांना दूरध्वनीद्वारे तातडीने संपर्क साधला जात आहे. यामुळे कॉपीमुक्तीसाठी मोठ्या प्रमाणात यश लाभत आहे. जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या माध्यमातून आनंददायी परीक्षा पॅटर्नअंतर्गत कॉपी मुक्तीसाठी अत्यंत जागरुकतेने काम करण्यात येत आहे.

            शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, बाळासाहेब बुगे, पोलिस निरीक्षक खेडकर, आकाश दरेकर, सुरेश ढवळे,श्रीराम थोरात,लहू गिरी,जितिन ओहोळ,भावेश परमार आदी समिती सदस्य तसेच तांत्रिक सहायक डॉ.अमोल बागूल  जिल्ह्यातील विविध केंद्रांवरील हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढ : सभापती शरद कार्ले .

    April 10, 2026

    बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत नवीन ट्विस्ट.

    April 9, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    अहिल्यानगर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त.

    August 25, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.