Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026
    Facebook Twitter
    Friday, September 18
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»ताज्या बातम्या»विधान परिषदेतील लक्षवेधीमुळे चौंडी सोसायटीचे खाते उघडले – वर्षाराणी उबाळे
    ताज्या बातम्या

    विधान परिषदेतील लक्षवेधीमुळे चौंडी सोसायटीचे खाते उघडले – वर्षाराणी उबाळे

    Samrudha NagarBy Samrudha NagarJanuary 3, 2026
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    विधान परिषदेतील लक्षवेधीमुळे चौंडी सोसायटीचे खाते उघडले संस्था नोंदणीचा मार्ग मोकळा
    मुख्य प्रवर्तक : वर्षाराणी पांडुरंग उबाळे

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क –
    नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदेचे आमदार प्रवीण जी दरेकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीमुळे जामखेड तालुक्यातील पुण्यश्लोक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या नोंदणीचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.

    जामखेड तालुक्याचे भूमिपुत्र राम शिंदे विधान परिषदेचे सभापती झाले. त्यानंतर पुण्यश्लोक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, चोंडी यांच्यावतीने लक्षवेधी दाखल करण्यात आली. या लक्षवेधीस आमदार प्रवीण दरेकर व श्रीकांत भारती यांनीही पाठिंबा देत लक्षवेधी मांडली. यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आदेश दिले. त्यावर उत्तर देताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी तात्काळ संस्थेचे खाते उघडण्याचे आदेश दिले. त्यामुळे एवढे दिवस प्रलंबित असलेला विषय मार्गी लागून कर्जवाटप करण्याचे आदेश देण्यात आले.
    सदर संस्थेचा प्रस्ताव दिनांक 17/4/2017 रोजी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, जामखेड यांच्याकडे दाखल करण्यात आला होता. सहकार आयुक्त कार्यालय, पुणे यांनी दिनांक 19/3/2024 रोजी या संस्थेस मंजुरी दिली होती. त्यानंतर दिनांक 15/4/2024 रोजी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, जामखेड यांनी संस्थेचे खाते उघडण्याबाबत पत्र दिले.

    मात्र अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दिनांक 10/6/2024 रोजी पत्र पाठवून दिनांक 24/2/2022 च्या ठराव क्रमांक 15 अन्वये खाते उघडता येणार नाही, असे कळविले.या बाबत विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, नाशिक यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली असता, तक्रारदार मुख्य प्रवर्तक वर्षाराणी पांडुरंग उबाळे यांनी अर्जात नमूद केल्याप्रमाणे संस्था खाते उघडणे ही बाब बँक स्तरावर असून तात्काळ कार्यवाही करावी तसेच बँकेचे मंजूर उपविधी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960, नियम 1961 मधील तरतुदी व शासन परिपत्रकांचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तरीदेखील संस्थेचे खाते उघडण्यात आले नाही.


    अखेर मुख्य प्रवर्तक यांनी मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ येथे रिट पिटीशन क्रमांक 2959/2025 दाखल केली असून सद्यस्थितीत हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
    गेल्या दोन वर्षांपासून अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने संस्थेचे मुख्य प्रवर्तक व सभासद शेतकरी यांची पिळवणूक केली. या कालावधीत शेतकऱ्यांना कर्जापासून, पंजाबराव कृषी पंत पुरवठा धोरणातील शून्य टक्के व्याजदर योजनेपासून तसेच कर्जमाफीसारख्या महत्त्वाच्या योजनांपासून वंचित ठेवण्यात आले. तसेच विविध कार्यालये व न्यायालयांच्या फेऱ्या मारण्यास भाग पाडण्यात आले.



    या निर्णयामुळे दिनांक 2/1/2026 रोजी संस्थेचे खाते उघडण्यात आले आहे. अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची मुदत फेब्रुवारी 2026 मध्ये संपत असून, येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावरच जामखेड तालुक्यात एका मतदानाची भर पडणार आहे. त्यामुळे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचे पारडे जड झाल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा प्रकारे प्रलंबित असणाऱ्या संस्थांचा मार्ग मोकळा झाल्यामुळे जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होताना दिसणार आहे.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    April 27, 2026

    बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत नवीन ट्विस्ट.

    April 9, 2026

    शिवरायांवरील वक्तव्याचा मुद्दा पुन्हा पेटला; छिंदमला सभागृहाबाहेर हाकलले

    March 27, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    अहिल्यानगर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त.

    August 25, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.