Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026
    Facebook Twitter
    Friday, September 18
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»Uncategorized»शेतीसाठी आता 12 फुटांचा रुंद शेतरस्ते अनिवार्य.ट्रॅक्टर, ट्रॉली, हार्वेस्टरची वाहतूक सुलभ; गावोगावी शेतमार्ग होणार सुरक्षित व दर्जेदार
    Uncategorized

    शेतीसाठी आता 12 फुटांचा रुंद शेतरस्ते अनिवार्य.ट्रॅक्टर, ट्रॉली, हार्वेस्टरची वाहतूक सुलभ; गावोगावी शेतमार्ग होणार सुरक्षित व दर्जेदार

    Samrudha NagarBy Samrudha NagarJanuary 27, 2026
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    समृद नगर न्यूज नेटवर्क – विशेष बातमी

    शेतीसाठी आता 12 फुटांचा रुंद शेतरस्ते अनिवार्य.
    ट्रॅक्टर, ट्रॉली, हार्वेस्टरची वाहतूक सुलभ; गावोगावी शेतमार्ग होणार सुरक्षित व दर्जेदार
    — महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन
    राज्यातील शेतकऱ्यांना शेतीपर्यंत पोहोचताना अरुंद व निकृष्ट शेतरस्त्यांमुळे भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी महसूल व वन विभागाने महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार गावोगावी शेतीकडे जाणारे शेतरस्ते किमान ३ ते ४ मीटर (सुमारे १२ फूट) रुंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.


    अनेक भागांत शेतरस्ते अतिशय अरुंद असल्याने ट्रॅक्टर, ट्रॉली, रोटाव्हेटर, सीड ड्रिल, हार्वेस्टर यांसारखी मोठी कृषी अवजारे शेतात नेणे कठीण होत होते. परिणामी शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि इंधनखर्च वाढत होता. काही ठिकाणी अवजारे रस्त्यात अडकणे, उलटणे किंवा अपघात होण्याच्या घटनाही घडत होत्या. नव्या आदेशामुळे मोठ्या यंत्रसामग्रीची वाहतूक सुलभ होऊन शेतीकामाची गती वाढण्यास मदत होणार आहे.


    रुंद आणि समतल शेतरस्त्यांमुळे सुरक्षिततेतही वाढ होणार असून पावसाळ्यातील चिखल, खड्डे आणि अडथळ्यांमुळे होणारी गैरसोय कमी होईल. शेतमाल वाहतुकीलाही याचा थेट फायदा होणार आहे. विशेषतः उस, भाजीपाला, धान्य, फळबाग उत्पादने यांची वाहतूक जलद व कमी खर्चात करता येणार आहे.
    या आदेशानुसार स्थानिक प्रशासन, महसूल यंत्रणा आणि ग्रामपंचायतींनी शेतरस्त्यांचे मोजमाप, नोंद आणि रुंदी सुनिश्चित करण्याची जबाबदारी पार पाडायची आहे. नव्याने प्रस्तावित किंवा दुरुस्त होणाऱ्या शेतरस्त्यांमध्ये ही रुंदी कायम ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
    ग्रामीण भागातील शेतीमार्ग अधिक नियोजनबद्ध, टिकाऊ आणि वापरास सोयीस्कर व्हावेत, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दिलासा मिळणार असून शेती यांत्रिकीकरणाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    अहिल्यानगर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त.

    August 25, 2026

    कांद्याच्या पिकाच्या आड अफूची शेती! बांधखडक येथे पोलिसांचा छापा; ६ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त २ जणांविरोधात गुन्हा

    March 12, 2026

    जामखेड–सौतडा महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करा. अन्यथा आंदोलन.

    January 5, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    अहिल्यानगर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त.

    August 25, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.