Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026
    Facebook Twitter
    Friday, September 18
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»ताज्या बातम्या»आ. रोहित पवार यांनी आधीच ब वर्ग दर्जा मिळवून आणला, तरी त्यासाठी आता प्रा. शिंदे यांचे पत्र.
    ताज्या बातम्या

    आ. रोहित पवार यांनी आधीच ब वर्ग दर्जा मिळवून आणला, तरी त्यासाठी आता प्रा. शिंदे यांचे पत्र.

    Samrudha NagarBy Samrudha NagarNovember 28, 2025
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    सभापती राम शिंदे यांचे वरातीमागून घोडे

    आ. रोहित पवार यांनी आधीच ब वर्ग दर्जा मिळवून आणला, तरी त्यासाठी आता प्रा. शिंदे यांचे पत्र.

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क –

    कर्जत-जामखेड, ता. २४ – आमदार रोहित पवार यांनी २०२२ मध्येच ब वर्ग दर्जा मिळवलेल्या आणि त्यासाठी भरीव निधी आणलेल्या खर्डा येथील संत श्री गितेबाबा या देवस्थानांसाठी विधानपरिषदेचे सभापतींनी आता हाच ब वर्ग दर्जा मिळवण्यासाठी ग्रामविकास मंत्र्यांना पत्र दिले आहे. प्रा. शिंदे यांच्या या वरातीमागून आणलेल्या घोड्याची कर्जत-जामखेड मतदारसंघात खमंग चर्चा सुरु आहे.

    खर्डा येथे सिद्धसंत श्री सिताराम बाबा आणि सद्गुरु संत श्री गितेबाबा या दोन देवस्थानांसाठी आमदार रोहित पवार यांनी आमदार झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारकडे पाठपुरावा करुन ब वर्ग दर्जा मिळवला. तसेच श्री सितारामबाबा देवस्थानाच्या विकासासाठी ३ लाख तर संत गितेबाबा देवस्थानासाठी ६ लाख रुपये इतका घसघशीत निधीही आणला. यामधून संत सितारामबाबा गडावर सभामंडप आणि महंत निवासस्थान उभारण्यात येत असून संत श्री गितेबाबा गडावर सभामंडप, महंत निवासस्थान, प्रसादालय आणि स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात येत आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार सत्तेतून गेले नसते तर आतापर्यंत कदाचित ही कामेही पूर्ण झाली असती, परंतु तरीही ही कामे सध्या पूर्णत्त्वाच्या अंतिम टप्प्यात आहेत.

    याशिवाय लालगीर स्वामी मठ, (मांदळी), श्री खंडोबा देवस्थान (शेगूड) आणि श्री जगदंबा मंदिर (कुळधरण) या देवस्थानांनाही ब वर्ग दर्जा मिळण्याबाबत प्रा. राम शिंदे यांनी ग्रामविकास मंत्र्यांना पत्र दिले आहे. मात्र लालगीर स्वामी मठ (मांदळी) आणि श्री खंडोबा देवस्थान (शेगूड) या देवस्थानांना ब वर्ग दर्जा मिळावा या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी २०२२ मध्येच तत्कालीन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र दिले आहे. आ.रोहित पवार यांनी केलेल्या मागणीसंदर्भात कक्ष अधिकारी, ग्रामविकास यांनी संबंधित सिईओ यांच्याकडून प्रस्ताव देखील मागवला आहे. तसेच आ. रोहित पवार यांनी लालगीर स्वामी मठासाठी ५० लाख रुपये, शेगूड येथील खंडोबा देवस्थानासाठी २५ लाख रुपये, कुळधरण येथील श्री जगदंबा देवस्थानासाठी आधी ४० लाख नंतर २०२३ मध्ये २८ लाख असे एकूण ६८ लाख रुपये मंजूर करुन आणले. असे असताना या धार्मिक स्थळांसाठी आणखी मोठ्या प्रमाणात निधी आणण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी ब वर्ग दर्जा मिळण्यासाठी पत्र दिल्याने या पत्राची मतदारसंघात उलटसुलट चर्चा सुरु आहे. आमदार रोहित पवार यांनी केलेल्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रा. राम शिंदे यांचा हा आटापीटा असल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये उमटत आहेत.

    कोट

    ‘‘कर्जत-जामखेड मतदारसंघातील सर्व धर्माच्या श्रद्धास्थळांसाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करुन आणला. तसंच संत श्री गितेबाबा देवस्थानासाठी आधीच ब वर्ग दर्जा मिळवून आणला. पण तरीही आपण काहीतरी केलं हे दाखवण्यासाठी प्रा. राम शिंदे यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. पण कर्जत-जामखेडची जनता आता दुधखुळी नाही. कोण काम करतं हे जनतेला चांगलं माहित आहे. प्रा. राम शिंदे यांना श्रेय घेण्याची फारच हौस असेल तर त्यांच्या पातळीवर आणखी निधी आणून या सरकारमध्ये आपलं वजन असल्याचं दाखवून द्या. तसंच मी मंजूर करून आणलेल्या कामांमध्ये आडकाठी आणली नाही तरी त्यांचे खूप उपकार होतील.’’ 

    रोहित पवार (आमदार, कर्जत-जामखेड)

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत नवीन ट्विस्ट.

    April 9, 2026

    शिवरायांवरील वक्तव्याचा मुद्दा पुन्हा पेटला; छिंदमला सभागृहाबाहेर हाकलले

    March 27, 2026

    दादा, तुम्ही वेळ चुकवलीत…’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भावनिक पोस्ट

    January 31, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    अहिल्यानगर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त.

    August 25, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.