Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    April 27, 2026

    जामखेड पंचायत समितीची आढावा बैठक; नागरिकांच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाहीच्या आ. रोहित पवारांच्या सूचना

    April 27, 2026

    जनगणना कामकाज प्रामाणिकपणे पार पाडा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

    April 24, 2026
    Facebook Twitter
    Thursday, April 30
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»ताज्या बातम्या»प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर; ६५ रक्तदात्यांनी केले रक्तदान.
    ताज्या बातम्या

    प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर; ६५ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

    Samrudha NagarBy Samrudha NagarJanuary 2, 2026
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर; ६५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

    युवा नेते तुषार काढणे यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क –दि १

    महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा नेते तुषार काढणे यांच्या वतीने बुधवार, १ जानेवारी २०२६ रोजी जवळा येथील बसस्थानक परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्याच्या विचारातून हा उपक्रम राबविण्यात आला.

    या रक्तदान शिबिरात तालुक्यातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत एकूण ६५ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. या रक्तदानामुळे समाजातील गरजू व आपत्कालीन परिस्थितीत असलेल्या रुग्णांसाठी ६५ रक्तपिशव्यांचा मौल्यवान साठा उपलब्ध झाला आहे. रक्ताची गरज भासणाऱ्या रुग्णांसाठी हा साठा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

    रक्तदान हे श्रेष्ठ दान असून एका रक्तदात्याच्या रक्तामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात. सामाजिक जाणीव ठेवून वाढदिवस, सण व विशेष दिवस समाजोपयोगी उपक्रमांद्वारे साजरे करण्याचा विचार सभापती प्रा. राम शिंदे यांनी सातत्याने मांडला आहे. त्याच विचारसरणीतून तुषार काढणे यांच्या पुढाकाराने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

    या शिबिरात अनुभवी वैद्यकीय तज्ज्ञ तसेच प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते. रक्तदान प्रक्रियेसाठी आवश्यक सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. रक्तदात्यांची वैद्यकीय तपासणी करूनच रक्तदान स्वीकारण्यात आले. स्वच्छता, आरोग्यविषयक नियम तसेच सुरक्षिततेचे सर्व निकष काटेकोरपणे पाळण्यात आले.

    जवळा बसस्थानक परिसरात आयोजित या शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे रक्तसाठ्यात लक्षणीय भर पडली असून आरोग्य सेवेच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला आहे.

    यावेळी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना हेल्मेट, पाण्याचे जार , हिवाळी जर्किन , आदीं वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षित तेची काळजी घेतली असल्याचे दिसत आहे.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत नवीन ट्विस्ट.

    April 9, 2026

    शिवरायांवरील वक्तव्याचा मुद्दा पुन्हा पेटला; छिंदमला सभागृहाबाहेर हाकलले

    March 27, 2026

    दादा, तुम्ही वेळ चुकवलीत…’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भावनिक पोस्ट

    January 31, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    April 27, 2026

    जामखेड पंचायत समितीची आढावा बैठक; नागरिकांच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाहीच्या आ. रोहित पवारांच्या सूचना

    April 27, 2026

    जनगणना कामकाज प्रामाणिकपणे पार पाडा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

    April 24, 2026

    जिल्ह्यात बालविवाहाविरोधात प्रशासनाची मोठी कारवाई.

    April 19, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.