Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    April 27, 2026

    जामखेड पंचायत समितीची आढावा बैठक; नागरिकांच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाहीच्या आ. रोहित पवारांच्या सूचना

    April 27, 2026

    जनगणना कामकाज प्रामाणिकपणे पार पाडा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

    April 24, 2026
    Facebook Twitter
    Thursday, April 30
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»ताज्या बातम्या»मनपा स्वीप समितीच्या वतीने “सिटी वोट फेस्टिवल”.
    ताज्या बातम्या

    मनपा स्वीप समितीच्या वतीने “सिटी वोट फेस्टिवल”.

    Samrudha NagarBy Samrudha NagarJanuary 7, 2026
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    मनपा स्वीप समितीच्या वतीने “सिटी वोट फेस्टिवल” (मतदार जागृती सप्ताह-२) चे आयोजन

    मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध स्पर्धांचा समावेश

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क , दि. ७ :

    महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर स्वीप समितीच्या माध्यमातून मनपा हद्दीतील विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी ८ ते १४ जानेवारी २०२६ दरम्यान “सिटी वोट फेस्टिवल” या मतदार जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात विविध प्रकारच्या स्पर्धा व उपक्रमांचा समावेश असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त तथा स्वीप नोडल अधिकारी अशोक साबळे यांनी दिली.

    ​निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व स्पर्धांसाठी ‘मतदार जनजागृती’ हा विषय निश्चित करण्यात आला आहे.

     सप्ताहातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे असतील :

    ८ जानेवारी रोजी भाषण स्पर्धा, ९ जानेवारी रोजी आई-वडिलांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्याबाबत शपथ व संकल्पपत्र, १० जानेवारी रोजी ‘संक्रांती मतदार जनजागृतीपर शुभेच्छापत्र (ग्रीटिंग) बनवा’ स्पर्धा, ११ जानेवारी रोजी पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर ऑनलाइन मतदार जनजागृती संदेश/इमेजेस/व्हिडिओचे वितरण, १२ जानेवारी रोजी महिला पालकांसाठी (मातांसाठी) मतदार जनजागृतीपर हळदी-कुंकू मेळावा, १३ जानेवारी रोजी शालेय परिसरातून प्रभात फेरी/शोभायात्रा/मतदार रॅली आणि १४ जानेवारी २०२६ रोजी ऑनलाइन मतदार जनजागृतीपर सामुहिक व्हॉट्सॲप संदेशांचे वितरण इत्यादी उपक्रम राबविले जाणार आहेत.

    ​या सर्व स्पर्धांसाठी पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी असे तीन गट आहेत. शालेय पातळीवर स्पर्धा घेऊन प्रथम तीन क्रमांक काढण्यात यावेत. तसेच स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचे मतदान संकल्पपत्र, भेटकार्ड व इतर लेखन साहित्य १७ जानेवारी २०२६ पर्यंत “स्वीपनगरी”, तळमजला, महानगरपालिका नूतन प्रशासकीय इमारत, छत्रपती संभाजीनगर रोड, अहिल्यानगर येथे पाठवावे. तसेच उपक्रमांचे फोटो, व्हिडिओ व वृत्तपत्रातील बातम्या आदी साहित्य ८०५५८ ०९३९४ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावे. सहभागी शाळा व कृतिशील शिक्षकांना सन्मानपत्र आणि विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. शालेय पातळीवर विविध उपक्रम राबवताना आदर्श आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे.

    ​जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन १०० टक्के मतदान करण्यासाठी आपल्या पालकांना प्रवृत्त करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार मुंढे, सहाय्यक आयुक्त मेहेर लहारे, मतदारदूत डॉ. अमोल बागुल, प्रसिद्धी अधिकारी नितीन ब्राह्मणे व प्रशासनाधिकारी जुबेर पठाण यांनी केले आहे.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत नवीन ट्विस्ट.

    April 9, 2026

    शिवरायांवरील वक्तव्याचा मुद्दा पुन्हा पेटला; छिंदमला सभागृहाबाहेर हाकलले

    March 27, 2026

    दादा, तुम्ही वेळ चुकवलीत…’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भावनिक पोस्ट

    January 31, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    April 27, 2026

    जामखेड पंचायत समितीची आढावा बैठक; नागरिकांच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाहीच्या आ. रोहित पवारांच्या सूचना

    April 27, 2026

    जनगणना कामकाज प्रामाणिकपणे पार पाडा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

    April 24, 2026

    जिल्ह्यात बालविवाहाविरोधात प्रशासनाची मोठी कारवाई.

    April 19, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.