Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Samrudha Nagar
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.
आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाहिली श्रद्धांजली समृद्ध नगर न्यूज नेटवर्क , दि.१७ : – राहुरीचे आमदार स्वर्गीय शिवाजीराव भानुदास कर्डिले यांच्या पार्थिवावर बुऱ्हाणनगर येथील त्यांच्या निवासस्थाना समोरील प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे यांनी त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. पोलीसांच्या पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. त्यांच्या पार्थिवास मुलगा अक्षय यांनी मुखाग्नी दिला. सात्वंनपर भावना व्यक्त करतांना सभापती प्रा.राम शिंदे म्हणाले, दिन- दलित, शोषीत, गरीब , कष्टकऱ्यांच्या पाठिशी ते नेहमीच…
नागरिकांचा संताप, आमदारांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती* आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीत जामखेडमध्ये आमसभा* नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारावर आमदार रोहित पवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना झापले. समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – संदर्भात जामखेड शहरातील नागरिकांनी सर्वात जास्त तक्रारी आमसभेत आमदार रोहित पवार यांच्यासमोर मांडल्या… नगरपरिषद सीईओ यांच्यावर नागरिकांनी कामात केलेली अफरातफर, शहरातील कचरा उचलण्यासाठी देण्यात आलेले कंत्राट… कचरा उचलण्यात होणारी टाळाटाळ, शहरातील चिखलमय रस्ते, गटारी, सांडपाण्याची विल्हेवाट, मोकाट जनावरे, मोकाट कुत्रे, तुंबलेल्या गटारी, अनियमित सुटलेले पाणी, मच्छरांचा होणारा उपद्रव आदी विषयावर आमदार रोहित पवार यांनी नागरिकांच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांना धारेवर धरलं… हा पैसा जनतेचा असून अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवणे हे त्यांचे कर्तव्य असल्याची…
आ रोहित पवार यांची आमसभा चालली आठ तास, नागरिकांच्या प्रश्नांनी अधिकाऱ्यांची उडाली दैना उद्याच्या जामखेड च्या आमसभेकडे लक्ष समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – कर्जतमध्ये आयोजित केलेल्या आमसभेत नागरिकांच्या तक्रारी समजून घेऊन अधिकाऱ्यांकडून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. सकाळी अकराच्या सुमारास सुरु झालेली आमसभा पावणेसात वाजण्याच्या सुमारास संपली. या सलग वेळेत नागरिकांच्या तक्रारी ऐकूण घेतल्या, यावरून प्रशासनाबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी असल्याचं स्पष्ट होतं. नुकत्याच अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना कोणत्याही शेतकऱ्याला यातून वगळण्यात येऊ नये, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला दिल्या. याशिवाय वीज कनेक्शनबाबत अडवणूक, डीपी न बसवणे, निकृष्ट दर्जाचं होणारं काम, रस्ते अडवणं, काही शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसणं, रेशनकार्ड न मिळणं,…
तातडीने पंचनामे करून तात्काळ मदत उपलब्ध करा – विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे अतिवृष्टीग्रस्त कर्जत व जामखेडमधील भागांची पाहणी. समृद्ध नगर न्यूज नेटवर्क १७ – अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कर्जत तालुक्यातील नागलवाडी, नागपूर, सितपूर, निंबोडी, तरडगाव, मलठण व जामखेड तालुक्यातील चौंडी या गावांना विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला. ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मुसळधार पावसामुळे शेती, चारा, जनावरांचे गोठे, रस्ते, पूल, बंधारे व पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर बाधित झाल्या आहेत. जिल्हा परिषद शाळांवर व घरांवरील छप्पर उडून गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण तसेच ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. चौंडी येथील…
राष्ट्रनेत्याच्या जन्मदिनापासून राष्ट्रपित्याच्या जयंतीपर्यंत ‘सेवा पंधरवडा’ समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – महसूल विभाग हा जनतेच्या दैनंदिन समस्या आणि जिव्हाळ्याच्या विषयांशी निगडीत असल्याने सामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक असण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 17 सप्टेंबर या जन्मदिनापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 2 ऑक्टोबर या जयंतीपर्यंत मोहीम स्वरुपात ‘सेवा पंधरवडा’ राबविण्यात येत आहे.महसूली क्षेत्रीय कार्यालयाकडून जनतेस सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी 2025-26 या वर्षात मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दि. 17 सप्टेंबर…
परितक्त्या महिलांच्या स्वावलंबनासाठी सर्वंकष व एकत्रित प्रयत्न करण्याची गरज – निवासी आयुक्त आर. विमला ‘सक्षम प्रदर्शन व विक्री’ उपक्रमाचा शुभारंभ समृद्ध नगर न्यूज नेटवर्क अहिल्यानगर , दि. १३- परितक्त्या महिलांना सामाजिक, आर्थिक व आरोग्यविषयक अनेक समस्या भेडसावत असून, या महिलांना त्यांच्या पायावर उभे करून समाजात ताठ मानेने जगण्यासाठी सर्वंकष व एकत्रित प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र सदन, नवी दिल्लीच्या निवासी आयुक्त आर. विमला यांनी केले. शहरातील आम्रपाली गार्डन येथे महिलांच्या सामर्थ्याला व स्वावलंबनाला नवी दिशा देणाऱ्या दोन दिवसीय ‘सक्षम प्रदर्शन व विक्री’ उपक्रमाचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपमुख्य कार्यकारी…
मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीस ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ.. समृद्ध नगर न्यूज नेटवर्क, दि. ३० : राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समितीस शासनाने दि. ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या २५ जानेवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये ही समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या कार्यकाळाला यापूर्वी ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.…
बँकांनी लाभार्थ्यांची कर्ज मंजुरीची प्रकरणे वेळेत मार्गी लावावीत – महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेतून राज्यातील १.५० लाख तर जिल्ह्यातील १८ हजार लाभार्थ्यांना लाभ समृद्ध नगर न्यूज अहिल्यानगर, दि. ६-मराठा समाजातील नवउद्योजकांना चालना देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे कर्ज प्रस्ताव बँकांनी सुलभ पद्धतीने व विहित कालावधीत मार्गी लावावेत, असे निर्देश महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी दिले. महामंडळाच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक घेण्यात आली. त्यावेळी श्री. पाटील बोलत होते. बैठकीस उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी आशिष नवले, महामंडळाच्या विभागीय समन्वयक पल्लवी मोरे, जिल्हा कौशल्य विकास,…
नान्नज मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी समृध्द नगर न्यूज नेटवर्क — साठे नगर, नान्नज येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात व सामाजिक बांधिलकीने साजरी करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमात साठे नगर येथील मातंग सैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये सुनील साठे, महादेव साठे, दीपक भवाळ, भिवा साठे, संजय साठे, राजेंद्र भगवान साठे,राजू साठे,शिवा साठे, लखन भवाळ,दादा कांबळे व साठे नगरमधील इतर मातंग युवकांचा सक्रिय सहभाग होता. यावेळी गावातील प्रमुख मान्यवर RPI सुनील साळवे, भाजपा उदय पवार, दादा राजे भोसले, मेजर प्रकाश राऊत, धनुशेठ…
आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक केलेल्या जिल्ह्यातील खेळाडूंचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव समृद्ध नगर न्यूज नेटवर्क दि २३- आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळवलेल्या जिल्ह्यातील चार खेळाडूंना राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या तसेच विविध जागतिक स्पर्धांसाठी निवड झालेल्या या खेळाडूंना जिल्हाधिकारी कार्यालयात स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांचा उत्साह वाढवला. क्रीडा व युवक संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा प्रशासनाच्या वतीने हा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,…