Author: Samrudha Nagar

सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

पाणंद मुक्त शिवार, समृद्धीची नवी वाट : ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ समृद्धी नगर विशेषवृत्त – महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या आपल्या बळीराजाला सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. शेतातील पिकांची पेरणी असो किंवा काढणीनंतरचा शेतमाल बाजारपेठेत पोहोचवणे असो, प्रत्येक टप्प्यावर हक्काच्या रस्त्याची गरज असते. हीच गरज ओळखून व शेतकऱ्यांच्या श्रमाला योग्य मोबदला मिळावा या उद्देशाने, राज्य शासनाने १४ डिसेंबर २०२५ रोजी “मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना” जाहीर केली आहे. हा निर्णय केवळ कागदावरचा नसून ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाची ही एक नवी पहाट ठरणार आहे. गावातून शेताकडे जाणारे रस्ते, ज्यांना आपण ‘पाणंद’ म्हणतो, त्यांची अवस्था पावसाळ्यात अत्यंत बिकट होते.…

Read More

खाकऱ्याच्या चवीतून लाखोंची उलाढाल ! ‘लखपती दीदी’ प्रियंका बेरड यांची यशस्वी भरारी ! समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – दि. १३ डिसेंबर ग्रामीण भागातील महिलांना केवळ ‘चूल आणि मूल’ या चौकटीत न पाहता, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाचा ‘उमेद’ (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) एक ‘दीपस्तंभ’ ठरला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील दरेवाडी येथील सौ. प्रियंका राजेंद्र बेरड यांचा प्रवास याच अभियानाच्या यशाची साक्ष देणारा आहे. एका सामान्य गृहिणीने जिद्द, कष्ट आणि शासनाच्या योजनेची सांगड घालत उभ्या केलेल्या ‘खाकरा’ व्यवसायाची ही प्रेरणादायी यशकथा आहे. बेरड कुटुंबात खाकरा बनवण्याचा व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत आलेला होता. प्रियंकाताईंचे सासरे अत्यंत कष्टाने हा व्यवसाय सांभाळत होते; मात्र, तो…

Read More

सभापती राम शिंदे यांचे वरातीमागून घोडे आ. रोहित पवार यांनी आधीच ब वर्ग दर्जा मिळवून आणला, तरी त्यासाठी आता प्रा. शिंदे यांचे पत्र. समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – कर्जत-जामखेड, ता. २४ – आमदार रोहित पवार यांनी २०२२ मध्येच ब वर्ग दर्जा मिळवलेल्या आणि त्यासाठी भरीव निधी आणलेल्या खर्डा येथील संत श्री गितेबाबा या देवस्थानांसाठी विधानपरिषदेचे सभापतींनी आता हाच ब वर्ग दर्जा मिळवण्यासाठी ग्रामविकास मंत्र्यांना पत्र दिले आहे. प्रा. शिंदे यांच्या या वरातीमागून आणलेल्या घोड्याची कर्जत-जामखेड मतदारसंघात खमंग चर्चा सुरु आहे. खर्डा येथे सिद्धसंत श्री सिताराम बाबा आणि सद्गुरु संत श्री गितेबाबा या दोन देवस्थानांसाठी आमदार रोहित पवार यांनी आमदार झाल्यानंतर…

Read More

            समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – विरोधकांजवळील कर्जत जामखेडचे लोक आपल्याला सोडुन भारतीय जनता पक्षात का आले याचे उत्तर विरोधकाना देत येत नाही. त्यांनी त्याचे आत्मचिंतन करण्याची गरज  आहे. आम्ही शहरातील प्रत्येक घटकांचा सखोल अभ्यास करुन वचननामा प्रसिद्ध करत आहोत. त्यामुळे नगरपरिषदेच्या सत्तेत येताच आम्ही वचनाला बांधील राहुन शहरात विकासकामे मार्गी लावण्यासाठी कटीबध्द राहणार असल्याचे सभापती प्रा राम शिंदे यांनी जामखेड येथे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.  जामखेड नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून शहरातील महत्त्वाच्या प्रश्नात हात घालून सर्वसमावेशक ३१ प्रकारच्या योजना या वचननाम्यात प्रमुखाने घेतल्या आहेत . यावेळी सभापती प्रा राम शिंदे निवडणूक प्रभारी शेखर…

Read More

जामखेड नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी 9 उमेदवार तर नगरसेवक पदासाठी 102 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. सभापती प्रा राम शिंदे , आ रोहित पवार यांची प्रतिष्ठा पणाला. समृद्ध नगर न्यूज नेटवर्क दि २ २ – नगराध्यक्षा कोण होणार ? सभापती प्रा राम शिंदे , आ, रोहित पवार यांची प्रतिष्ठा पणाला, शिवसेना शिंदे , राष्ट्रवादी {AP} पक्ष, प्रीती राळेभात यांचीही राहणार महत्वाची भूमिका महत्वाची राहणार आहे. त्यामध्ये मुस्लीम उमेदवार यांची या निवडणुकीत महत्वाची भूमिका राहणार असल्याने जामखेड नगरपरिषद निवडणुकी चांगलीच रंगात आली आहे. जामखेड नगरपरिषद निवडणूकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 13 नगराध्यक्षांपैकी 4 उमेदवारांनी माघार घेतली. तर 120 अर्ज भरलेल्या नगरसेवकांपैकी 18 उमेदवारांनी…

Read More

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक उमेदवारांसाठी महत्वाची माहिती. – जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले आवाहन. समृद्ध नगर न्यूज नेटवर्क  दि. २० :- जिल्ह्यातील कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, शिर्डी व श्रीगोंदा नगरपरिषद तसेच नेवासा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिराती प्रसारणापूर्वी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व नियंत्रण समितीकडून इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व नियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ.पंकज आशिया यांनी केले आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ११ नगरपरिषद व १ नगरपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून आजपासून…

Read More

अतिवृष्टीग्रस्त कर्जत – जामखेड मधील शेतकऱ्यांची दिवाळी गोड १५८ कोटी ३१ लाख रुपयांचे भरीव अनुदान दिवाळीपूर्वीच थेट खात्यात जमा होण्यास सुरुवात.. महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांची माहिती समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – माहे सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे कर्जत-जामखेडसह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. अनेक शेतकऱ्यांचे पिके वाहून गेली, बंधारे तुटले, घरांचे नुकसान झाले, आणि हजारो हेक्टर क्षेत्रातील उभे पीक पूर्णतः नष्ट झालेले होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय घेतला असून, अहिल्यानगर जिल्ह्यातील ८ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांना एकूण ८४६ कोटी ९६ लाख रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आलेले…

Read More

कर्जत – जामखेड मतदारसंघातील ८ नवीन शाळा खोल्यांसाठी ९६ लक्ष रुपयांचा निधी मंजूर महाराष्ट्र विधानपरिषद सभापती, प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमातून निधी मंजूर समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – १६ ऑक्टोबर ) महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमातून कर्जत – जामखेड मतदारसंघातील शिक्षण क्षेत्रात मोठी भर पडली आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत कर्जत तालुक्यातील ५ शाळा खोल्यांसाठी ६० लाखांचा निधी तर जामखेड तालुक्यातील ३ शाळा खोल्यांसाठी ३६ लाखांचा असा एकूण ८ नवीन शाळा खोली बांधकामांसाठी तब्बल ९६ लाख रुपयांचा भरीव निधी कर्जत – जामखेड मतदार संघासाठी मंजूर झाला असल्याची माहिती विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांची कार्यालयाने दिली. कर्जत तालुक्यातील मंजूर कामांमध्ये मौजे…

Read More

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाख रुपयांची मदत; दिवाळीपूर्वी खात्यात निधी वर्ग करण्याच्या सूचना – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील समृद्ध नगर न्यूज नेटवर्क , दि. १८ :- सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने ८ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांना एकूण ८४६ कोटी ९६ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा निर्णय घेतला आहे. दिवाळीपूर्वी ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध भागांतील शेतीपिकांचे नुकसान झाले असून, जिल्ह्यात सुमारे ६…

Read More

जे लोकांच्या संपर्कात नव्हते, त्यांनाही जिल्हापरिषदेचे स्वप्न ? सोशल मीडियावर भावीची भाऊ गर्दी, आरक्षण जाहीर झाल्याने कार्यकर्ते लागले कामाला, भाजप राष्ट्रवादी मध्ये होणार काटेकी टक्कर, मित्र पक्षांची भूमिका राहणार निर्णायक समृद्ध नगर न्यूज नेटवर्क दि १८ – जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर झाल्याने सर्वच पक्षाचे इच्छुक कार्यकर्ते कामाला लागले असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर तर भावी ची भाऊगर्दी पाहायला मिळत आहे. जे लोकांच्या संपर्कात नव्हते ते ही इच्छुकांच्या यादी येत असल्याचे दिसत आहे. जिल्हापरिषद व पंचायत समितीची निवडणूक आ रोहित पवार यांच्यासाठी पहिल्यांदाच असल्याने या निवडणुकीत त्यांची खरी कस लागणार आहे. तर सभापती प्रा राम…

Read More