Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Samrudha Nagar
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.
योग्य पाणी-खत व्यवस्थापनातून गहू उत्पादनात वाढ, वाचा सविस्तर गहू पिकाचे खत पाण्याचे नियोजन. समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – गव्हाचे पीक जोमदार येण्यासाठी केवळ खतांचा अतिरेक न करता पाणी व खत यांचे योग्य नियोजन आणि अचूक वेळ साधणे आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीमुळे अनेकदा खतांचा अपेक्षित परिणाम मिळत नसल्याने उत्पादनावर परिणाम होत आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, शास्त्रीय पद्धतीने पाणी व खत व्यवस्थापन केल्यास गहू उत्पादनात लक्षणीय वाढ शक्य आहे. गव्हाच्या पेरणीनंतर साधारण १५ ते २० दिवसांनी, जमीन वाफसा स्थितीत आल्यानंतर पहिले पाणी देणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. या टप्प्यावर पिकाला दिलेली विश्रांती मुळांची वाढ वाढवते आणि फुटवे जोमाने येण्यास मदत करते. घाईने पाणी…
समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – दि.29 शिक्षिका शोभा डांगे यांना अखेर न्यायशिवसेना तालुका उपप्रमुख नितीन कोल्हे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश. बीड | प्रतिनिधी – बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागातील एका प्रलंबित व अन्यायकारक प्रकरणाला अखेर न्याय मिळाला असून शिक्षिका शोभा शिवाजीराव डांगे यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. शिवसेना तालुका उपप्रमुख नितीन कोल्हे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा व ठोस भूमिकेमुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात बीड जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) किरण कुवर यांची प्रत्यक्ष भेट घेण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहसचिव एकनाथ शेलार यांच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे संबंधित शिक्षक प्रश्नावर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला.शिक्षिका शोभा डांगे यांच्यावर झालेला…
सर्वसामान्य कुटुंबातील नगरसेविकेला विक्रमी मताधिक्याने निवडून देण्याची ताकद फक्त भाजपकडे – नंदा होळकर समृद्धी नगर न्यूज नेटवर्क दि २९ – जामखेड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ७ मधून सभापती प्रा राम शिंदे यांनी सर्वसामान्य कुटुंब असलेले होळकर यांना उमेदवारी देऊन निवडून आणले आहे. त्यामुळे सर्व सामान्य कुटुंबातून राजकारणात प्रवेश केलेल्या नंदा प्रविण होळकर यांनी तब्बल ९१० मतांच्या विक्रमी फरकाने दणदणीत विजय मिळवून जामखेडच्या राजकारणात नवा अध्याय लिहिला आहे. महिलांमध्ये ४८८ मतांचे सर्वाधिक मताधिक्य मिळवत त्यांनी मोठा विजय मिळविला आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबाला उमेदवारी देऊन निवडून आणण्याची ताकद फक्त भाजपकडे असल्नंयाचे नवनिर्दावाचित नगरसेविका नंदा होळकर यांनी समृद्ध नगर न्यूज नेटवर्क दिलेल्या मुलाखतीत बोलत…
सभापती प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर, युवा नेते तुषार काढणे यांच्या वतीने आयोजन समृद्ध नगर न्यूज नेटवर्क दि २९ महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती मा. प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा नेते तुषार काढणे यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन बुधवार, १ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे. समाजातील गरजू रुग्णांसाठी रक्तसाठा उपलब्ध व्हावा तसेच युवकांमध्ये समाजसेवेची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.रक्तदान हे श्रेष्ठ दान असून एका रक्तदात्याच्या रक्तामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात. वाढदिवसासारखा आनंदाचा दिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्याची प्रेरणा सभापती प्रा. राम शिंदे यांनी सातत्याने दिली असून त्याच विचारातून…
नगरपरिषद, नगरपंचायतीच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व व मतदानाचा अधिकार अधिनियमात सुधारणा; अध्यादेश काढण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय प्रांजली चिंतामणी यांना होणार थेट फायदा समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – दि २५ नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व तसेच मतदानाचा अधिकार देण्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. यासाठी अध्यादेश काढण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयाचा थेट फायदा जामखेड नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रांजली चिंतामणी यांना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जामखेड नगरपरिषदेमध्ये प्रांजली चिंतामणी या थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षा…
सरकारची शेतकरीविरोधी भूमिका , आ रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली जामखेडमध्ये निर्णायक संघर्ष समृद्ध नगर न्यूज नेटवर्क दि २२ – अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना, शासन मात्र डोळेझाक, टाळाटाळ आणि घोषणाबाजी यापलीकडे काहीच करत नसल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवार, दि. 23 डिसेंबर 2025 रोजी जामखेडमध्ये होणारा शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा हा केवळ आंदोलन नसून, सरकारच्या अपयशाविरोधातील थेट आरोपपत्र आहे, असे मत राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. यंदाच्या अतिवृष्टीने जामखेड तालुक्यात सोयाबीन, तूर, उडीदसह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र नुकसान भरपाई आणि पीकविमा याबाबत शासनाने आजवर ठोस निर्णय न घेतल्याने…
सभापती प्रा राम शिंदे व प्रशांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन, जवळा येथे ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांचे भव्य हरिकीर्तन सोहळासमृद्ध नगर न्यूज नेटवर्क दि २२ – महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती मा. प्रा. राम शिंदे यांच्या १ जानेवारी रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जामखेड तालुकाध्यक्ष व जवळा गावचे मा सरपंच प्रशांत शिंदे यांच्या २४ डिसेंबर रोजीच्या वाढदिवसानिमित्त जवळा (ता. जामखेड) येथे भव्य, भक्तीमय व समाजप्रबोधनपर हरिकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे संपूर्ण जवळा परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या पावन प्रसंगी समाजप्रबोधनकार, विचारवंत व युवा कीर्तनकार म्हणून राज्यभर परिचित…
ई-पीक पाहणी नोंदणीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी ‘ऑफलाईन’ पाहणीची संधी. २४ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन समृद्ध नगर न्यूज नेटवर्क , दि. २२:- राज्यात खरीप हंगाम २०२५ मध्ये विहित मुदतीत ई-पीक पाहणीची नोंद करू न शकलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. अशा शेतकऱ्यांच्या पिकांची ‘ऑफलाईन’ पध्दतीने पाहणी व नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यानुसार, संबंधित शेतकऱ्यांनी २४ डिसेंबर २०२५ पर्यंत आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. महसूल व वन विभागाने १४ डिसेंबर २०२५ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयान्वये आणि जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य) डॉ.…
जामखेड–सौताडा रस्त्याच्या कामात अडथळा आणल्यास कडक कायदेशीर कारवाई जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचा इशारा; संथ कामाबाबत अधिकाऱ्यांची झाडाझडती समृद्ध नगर न्यूज नेटवर्क दि १८ – गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून सुरू असलेल्या जामखेड–सौताडा राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे जामखेड शहरातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. विशेषतः शहरातील मुख्य असलेल्या खर्डा चौक ते समर्थ हॉस्पिटल या अंतर्गत रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून संथ गतीने सुरू असून नागरिकांना रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जामखेड तहसील कार्यालयात संबंधित सर्व विभागांचे अधिकारी व ठेकेदार यांची तातडीची आढावा बैठक घेतली. बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामातील दिरंगाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त…
प्रा. राम शिंदे : विधानपरिषद सभापतीपदाच्या कार्यकाळाची गौरवास्पद वर्षपूर्तीचा समृद्ध नगर न्यूज नेटवर्क घेतलेला आढावा. समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – *महाराष्ट्र विधानपरिषदेचे माननीय सभापती प्रा. राम शिंदे यांची सभागृहाने सभापतीपदी एकमताने 19 डिसेंबर, 2024 रोजी निवड केली. त्यास एक वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त त्यांनी घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांबाबत आणि पीठासीन अधिकारी म्हणून दिलेल्या योगदानासंदर्भात हा एक दृष्टीक्षेप… प्राध्यापक असल्याने शिस्त आणि नियमांचे काटेकोर पालन, हे सभापती महोदयांचे गुणविशेष सभागृह कामकाजाचे संचालन करताना सर्व सन्माननीय सदस्यांना विशेषत्वाने जाणवतात. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यामुळेच त्यांचा ‘हेडमास्तर’ असा आदराने उल्लेख केला आहे. एकमताने सभापतीपदी निवड झाल्यानंतर सभागृहात माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सर्वपक्षीय…