Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील १६.९६ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

    July 24, 2026

    जामखेड येथे ‘साई समर्थ हाडांचा दवाखाना व एम.आर.आय. सेंटर’चा २ ऑगस्ट रोजी शुभारंभ

    July 24, 2026

    राजेंद्र पवार यांचे शेती व शेतकऱ्यांसाठीचे कार्य प्रेरणादायी – केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

    July 19, 2026
    Facebook Twitter
    Monday, August 3
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»Uncategorized»सभापती प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर, युवा नेते तुषार काढणे यांच्या वतीने आयोजन.
    Uncategorized

    सभापती प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर, युवा नेते तुषार काढणे यांच्या वतीने आयोजन.

    Samrudha NagarBy Samrudha NagarDecember 29, 2025
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    सभापती प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर, युवा नेते तुषार काढणे यांच्या वतीने आयोजन
    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क दि २९
    महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती मा. प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा नेते तुषार काढणे यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन बुधवार, १ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे. समाजातील गरजू रुग्णांसाठी रक्तसाठा उपलब्ध व्हावा तसेच युवकांमध्ये समाजसेवेची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
    रक्तदान हे श्रेष्ठ दान असून एका रक्तदात्याच्या रक्तामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात. वाढदिवसासारखा आनंदाचा दिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्याची प्रेरणा सभापती प्रा. राम शिंदे यांनी सातत्याने दिली असून त्याच विचारातून हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे, असे मत आयोजकांनी व्यक्त केले.


    या शिबिरात अनुभवी वैद्यकीय तज्ज्ञ व प्रशिक्षित कर्मचारी उपस्थित राहणार असून रक्तदान प्रक्रियेसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. रक्तदात्यांच्या सुरक्षिततेसाठी वैद्यकीय तपासणी, स्वच्छता व आरोग्यविषयक सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जाणार आहे. जवळा येथील बसस्थानक परिसरामध्ये रक्तदान आयोजन करण्यात आले आहे.


    भाजपा कार्यकर्ते, युवा मोर्चाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, युवक व सर्वसामान्य नागरिकांनी या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन भाजपा युवा नेते तुषार काढणे यांच्या वतीने करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे समाजात मानवतावादी विचारांना बळ मिळेल तसेच रुग्णालयातील रक्तसाठ्यात मोलाची भर पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.



    १ जानेवारीला रक्तदान करून वाढदिवस साजरा करा
    सभापती मा. प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त युवकांनी सहभागी होऊन समाजोपयोगी कार्यात हातभार लावावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत नवीन ट्विस्ट.

    April 9, 2026

    शिवरायांवरील वक्तव्याचा मुद्दा पुन्हा पेटला; छिंदमला सभागृहाबाहेर हाकलले

    March 27, 2026

    कांद्याच्या पिकाच्या आड अफूची शेती! बांधखडक येथे पोलिसांचा छापा; ६ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त २ जणांविरोधात गुन्हा

    March 12, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील १६.९६ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

    July 24, 2026

    जामखेड येथे ‘साई समर्थ हाडांचा दवाखाना व एम.आर.आय. सेंटर’चा २ ऑगस्ट रोजी शुभारंभ

    July 24, 2026

    राजेंद्र पवार यांचे शेती व शेतकऱ्यांसाठीचे कार्य प्रेरणादायी – केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

    July 19, 2026

    मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद; दरोड्यासह १० गुन्ह्यांची उकल

    July 15, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.