Author: Samrudha Nagar

सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

मनपा स्वीप समितीच्या वतीने “सिटी वोट फेस्टिवल” (मतदार जागृती सप्ताह-२) चे आयोजन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध स्पर्धांचा समावेश समृद्ध नगर न्यूज नेटवर्क , दि. ७ : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर स्वीप समितीच्या माध्यमातून मनपा हद्दीतील विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी ८ ते १४ जानेवारी २०२६ दरम्यान “सिटी वोट फेस्टिवल” या मतदार जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात विविध प्रकारच्या स्पर्धा व उपक्रमांचा समावेश असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त तथा स्वीप नोडल अधिकारी अशोक साबळे यांनी दिली. ​निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व स्पर्धांसाठी ‘मतदार जनजागृती’ हा विषय निश्चित करण्यात आला…

Read More

अपघाताची घटना घडताच नगराध्यक्षांसह नगरसेवक ॲक्शन मोडवर मॉर्निंग वॉकदरम्यान महिलेचा दुर्दैवी मृत्यू; तत्काळ रस्त्यातील झाडे हटविण्याची कार्यवाही नगरसेवक मोहन पवार व समृद्ध न्यूज नेटवर्क – : नववर्षाच्या पहाटेच जामखेड शहरात काळीज पिळवटून टाकणारी दुर्दैवी घटना घडली. तपनेश्वर गल्ली परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन महिलांना भरधाव पिकअप वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात विमल महादेव गांगर्डे (वय ५४, रा. तपनेश्वर गल्ली) यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी महिला किरकोळ जखमी झाली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना समजताच नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी तात्काळ कारवाई करत रस्त्यातील झाडे हटविण्याचे काम सुरू केले आहे. या…

Read More

जामखेड–सौतडा महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तहसीलदारांना निवेदन १० दिवसांत काम न झाल्यास आंदोलनाचा इशारा समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – दि. ५ : जामखेड–सौतडा राष्ट्रीय महामार्गावरील खर्डा चौक ते समर्थ हॉस्पिटल दरम्यान सुरू असलेले रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून अत्यंत संथ गतीने सुरू असून अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. या रखडलेल्या कामामुळे जामखेड शहर व तालुक्यातील नागरिक, व्यापारी, विद्यार्थी तसेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना खोदकाम करून काम अर्धवट सोडण्यात आल्याने ठिकठिकाणी अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी वारंवार वाहतूक कोंडी होत असून शाळा, महाविद्यालये, रुग्णालये व…

Read More

विधान परिषदेतील लक्षवेधीमुळे चौंडी सोसायटीचे खाते उघडले संस्था नोंदणीचा मार्ग मोकळामुख्य प्रवर्तक : वर्षाराणी पांडुरंग उबाळे समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदेचे आमदार प्रवीण जी दरेकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीमुळे जामखेड तालुक्यातील पुण्यश्लोक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या नोंदणीचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. जामखेड तालुक्याचे भूमिपुत्र राम शिंदे विधान परिषदेचे सभापती झाले. त्यानंतर पुण्यश्लोक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, चोंडी यांच्यावतीने लक्षवेधी दाखल करण्यात आली. या लक्षवेधीस आमदार प्रवीण दरेकर व श्रीकांत भारती यांनीही पाठिंबा देत लक्षवेधी मांडली. यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आदेश दिले. त्यावर उत्तर देताना सहकार मंत्री…

Read More

सभापती प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त खर्डा जि. प. शाळेत शालेय साहित्य वाटपभाजपा जि. प. खर्डा गटातील कार्यकर्त्यांचा उपक्रम समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त खर्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद खर्डा गटाच्या वतीने हा सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे व त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी (दि. १ जानेवारी २०२६) सकाळी १०.३० वाजता जि. प. प्राथमिक शाळा, खर्डा येथे विद्यार्थ्यांना वह्या, पेन…

Read More

शाळा-कॉलेज सुटल्यानंतर मुलींना छेडछाडीचा त्रास; श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जामखेड पोलिसांकडे निवेदन समृद्ध नगर न्यूज नेटवर्क दि 2 जामखेड शहरात शाळा व महाविद्यालय सुटल्यानंतर मुलींना छेडछाडीचा व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याच्या घटना वाढत असून, याबाबत तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुराजे मधुकर भोसले यांनी जामखेड पोलीस स्टेशनकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, शहरातील शाळा-महाविद्यालय परिसर, कॉलेज रोड, चौक, तहसील कार्यालय परिसर तसेच बसस्थानक परिसरात काही टवाळखोर युवक मोटारसायकल वेगात चालवणे, मुलींना कट मारणे, हार्न वाजवणे, हातवारे करणे, अश्लील टोमणे मारणे अशा प्रकारे खुलेआम छेडछाड करत आहेत. अलीकडेच जामखेड बसस्थानक परिसरात मुलींना छेडछाडीचा प्रकार…

Read More

प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर; ६५ रक्तदात्यांनी केले रक्तदान युवा नेते तुषार काढणे यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद समृद्ध नगर न्यूज नेटवर्क -दि १ महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा नेते तुषार काढणे यांच्या वतीने बुधवार, १ जानेवारी २०२६ रोजी जवळा येथील बसस्थानक परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्याच्या विचारातून हा उपक्रम राबविण्यात आला. या रक्तदान शिबिरात तालुक्यातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत एकूण ६५ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. या रक्तदानामुळे समाजातील गरजू व आपत्कालीन परिस्थितीत असलेल्या रुग्णांसाठी ६५ रक्तपिशव्यांचा मौल्यवान साठा उपलब्ध झाला आहे.…

Read More

सभापती प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबिर , शिबिरात 100 पेक्षा जास्त रुग्णांची नेत्र तपासणी समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – जामखेड भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रशांत शिंदे यांच्या पुढाकारातून सभापती प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये १०० पेक्षा अधिक रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर 10 रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी अहिल्यानगर येथील आनंदऋषीजी नेत्रालय येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे गरजू व वयोवृद्ध रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. याच अनुषंगाने, भाजप…

Read More

मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम काटेकोरपणे राबवा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम समृद्ध नगर न्यूज नेटवर्क , दि. १ : आगामी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीचे काम अत्यंत अचूक व पारदर्शक पद्धतीने होणे आवश्यक आहे. यासाठी मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम काटेकोरपणे राबवून विहित वेळेत अंतिम मतदारयादी निर्दोष प्रसिद्ध करावी, अशा सूचना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिल्या. शिर्डी येथे ‘ २२३ – राहुरी विधानसभा ‘ मतदारसंघाची पोटनिवडणूक व विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके, शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी…

Read More

सभापती प्रा. राम शिंदे यांनी घेतले प्रभु श्री जगन्नाथांचे पावन दर्शनसमृद्ध नगर न्यूज नेटवर्क जगन्नाथ पुरी (ओडिशा) हिंदू धर्मातील चार प्रमुख धामांपैकी एक असलेल्या ओडिशातील पवित्र जगन्नाथ पुरी येथे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सहकुटुंब प्रभु श्री जगन्नाथांचे पावन दर्शन घेतले. या पावन तीर्थक्षेत्री दर्शनाचा योग लाभल्याने त्यांनी समाधान आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. जगन्नाथ पुरी हे केवळ धार्मिक श्रद्धेचेच नव्हे, तर भारतीय संस्कृती, परंपरा आणि अध्यात्माचे प्रमुख केंद्र मानले जाते. येथे विराजमान असलेले प्रभु श्री जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा माता समता, भक्ती, मानवता आणि सामाजिक एकतेचा संदेश देतात. देशभरातून तसेच विदेशातूनही लाखो भाविक दरवर्षी येथे दर्शनासाठी येतात. प्रा. राम…

Read More