Author: Samrudha Nagar

सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

वाराणसीतील मणिकर्णिका घाटावरील ऐतिहासिक मंदिरे तोडल्याच्या निषेधार्थ जामखेड येथे निवेदन समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – :वाराणसी येथील गंगा नदीच्या काठावर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या मणिकर्णिका घाटावरील मंदिरे व ऐतिहासिक वास्तू विकासाच्या नावाखाली तोडण्यात आल्याच्या घटनेचा जामखेड येथे निषेध करण्यात आला. या संदर्भात तहसील कार्यालयात तहसीलदारांना निषेध निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले की, मणिकर्णिका घाटावरील मंदिरे व वास्तू या भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहेत. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेली ही मंदिरे श्रद्धा, परंपरा व इतिहासाचे प्रतीक असून शेकडो वर्षांपासून भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र राहिली आहेत. सध्या सुरू असलेल्या सुधारणा व विकासकामांच्या नावाखाली या प्राचीन वास्तूंची…

Read More

ग्रामीण रुग्णालयांतील अडचणींबाबत आ सुरेश धस यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट. समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – ता.15 आष्टी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण रुग्णालयांमधील गंभीर आरोग्यविषयक अडचणींबाबत जिल्हा रुग्णालय बीड येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली, अशी माहिती आष्टी विधानसभा मतदारसंघाचे नेते सुरेश धस यांनी दिली. ग्रामीण रुग्णालय आष्टी, ट्रॉमा केअर आष्टी, ग्रामीण रुग्णालय पाटोदा तसेच ग्रामीण रुग्णालय शिरूर कासार येथे वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, औषध निर्माता व इतर आवश्यक पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळत नाही. आवश्यक सुविधा असतानाही रुग्णांना खाजगी रुग्णालये व प्रयोगशाळांकडे पाठविले जात असल्याच्या तक्रारी असल्याचे…

Read More

महसुली नोंदीतील ‘मोटस्थळ’ म्हणजे कायजुने पाणीहक्क आजही कायदेशीरदृष्ट्या महत्त्वाचेसमृद्ध नगर न्यूज नेटवर्क विशेष वृत्त – ग्रामीण भागातील जमिनीच्या व्यवहारात आढळणारा “मोटस्थळ” हा जुना महसुली शब्द सध्या अनेक ठिकाणी पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे. आधुनिक काळात विद्युत पंप व बोअरवेलचा वापर वाढला असला, तरी जुन्या महसुली नोंदींमध्ये नमूद असलेला मोटस्थळाचा हक्क आजही कायदेशीरदृष्ट्या महत्त्वाचा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पूर्वी शेतजमिनीस पाणीपुरवठा करण्यासाठी मोट, रहाट, चरखी यांसारख्या पारंपरिक साधनांचा वापर केला जात असे. विहीर, नदी किंवा नाल्यातून पाणी उपसण्यासाठी ज्या ठिकाणी ही साधने बसवली जात, त्या ठिकाणास महसुली भाषेत “मोटस्थळ” असे संबोधले जाई. ब्रिटिशकालीन महसुली व्यवस्थेत पाणीपुरवठा ही शेतीची मूलभूत गरज मानली…

Read More

कृषी योजनांची जनजागृती शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – , दि. १५ : केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यात येत आहे. या योजनांचा लाभ तळागाळातील शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी कृषी विभागाने योजनांची जनजागृती थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करावी, असे आवाहन राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. ​राहाता तालुक्यातील पिंपळवाडी, रामपूरवाडी, आडगाव, नांदूर, शिर्डी व पुणतांबा अशा गावांमधील ११ शेतकऱ्यांची कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ‘कम्बाईन हार्वेस्टर’साठी निवड झाली आहे. या मंजूर हार्वेस्टरचे वितरण पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत…

Read More

समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – – देशाच्या शेतीच्या भविष्याची दिशा दाखविणारे बारामतीचे कृषिक प्रदर्शन यंदा आठवडाभर! १७ ते २४ जानेवारी दरम्यान अकरावे कृषि प्रदर्शन कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर आज दि. 10 जानेवारी 2026 रोजी कृषक 2026 प्रात्याक्षिके आधारित कृषी प्रदर्शनाबाबत एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन मा. श्री. राजेंद्रदादा पवार व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रो. निलेश नलावडे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. गेली 10 वर्षे बारामतीच्या अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्रामार्फत कृषिक हे शेतीविषयक प्रदर्शन भरवले जाते. यंदाचे हे ११ वे वर्ष आहे. सदर प्रदर्शनाचे उद्घाटन दि. १७ जानेवारी रोजी राज्याचे महामहीम राज्यपाल तसेच राज्याचे कृषी मंत्री यांच्या हस्ते…

Read More

सभापती प्रा.राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्धव हुलगुंडे यांचा समाजोपयोगी उपक्रमनिवारा बालगृहातील मुलांना जीवनावश्यक साहित्याचे वाटपसमृद्ध न्यूज नेटवर्क -: ता.11महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती मा. ना. प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवक उद्धव हुलगुंडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत माणुसकीचे दर्शन घडविले. समता भूमी, मोहा फाटा, जामखेड येथील निवारा बालगृहातील अनाथ, वंचित, गोरगरीब, बहुजन व उपेक्षित निराधार बालकांना किराणा व जीवनोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत बालगृहातील मुलांना दैनंदिन उपयोगाच्या वस्तू, अन्नधान्य व आवश्यक साहित्य देऊन त्यांच्या गरजांची पूर्तता करण्यात आली. समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी अशा प्रकारचे उपक्रम प्रेरणादायी असून वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्याचा संदेश यावेळी देण्यात आले. या प्रसंगी श्री.…

Read More

खर्डा चौकात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी जागा आरक्षित करण्याची मागणी शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी. समृद्ध नगर न्यूज नेटवर्क दि 11: जामखेड नगरपरिषदेच्या प्रारूप विकास आराखड्यात शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या खर्डा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी स्वतंत्र जागा आरक्षित करण्यात यावी, अशी मागणी समस्त शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. जामखेड नगरपरिषदेमार्फत दि. २० डिसेंबर २०२२ रोजी पंचायत समिती सभागृह, जामखेड येथे प्रारूप विकास आराखड्यामध्ये आवश्यक सार्वजनिक सोयी-सुविधांची आरक्षणे प्रस्तावित करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जामखेड शहरातील शिवप्रेमी नागरिकांनी खर्डा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात…

Read More

बाल वैज्ञानिक प्रदर्शन विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता, संशोधन वृत्तीला दिशा देणारे व्यासपीठ – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील जिल्हास्तरीय ५३ वे बाल वैज्ञानिक प्रदर्शन पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न समृद्ध नगर न्यूज नेटवर्क , दि. ९ :- बाल वैज्ञानिक प्रदर्शन हे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता व संशोधन वृत्तीला दिशा देणारे प्रभावी व्यासपीठ आहे. आजचा विद्यार्थी हा उद्याचा शास्त्रज्ञ, संशोधक, अभियंता व राष्ट्रनिर्माता आहे. त्यामुळे देशपातळीवर होत असलेल्या नवनवीन संशोधनाची माहिती विद्यार्थ्यांना देणे आवश्यक असून, त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. जामखेड येथील नागेश विद्यालय येथे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग व जिल्हा विज्ञान-गणित…

Read More

जामखेड तालुक्यातील मांजरा नदीवरील मोठ्या पुलासाठी नाबार्डकडून ८ कोटींचा निधी मंजूर विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – ०८ जानेवारी  जामखेड तालुक्यातील दिघोळ–माळेवाडी ग्रामीण मार्ग क्रमांक २३ वरील मांजरा नदीवरील मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी नाबार्डच्या माध्यमातून ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीमुळे ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार व सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध होणार असून, जामखेड तालुक्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. पुलाचे काम तातडीने पूर्ण व्हावे यासाठी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती मा.ना. प्रा. राम शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश येत राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्या (नाबार्ड) ग्रामीण पायाभूत सुविधा…

Read More

अपघातग्रस्त युवकाच्या मदतीला शिंदेंची शिवसेना आली धावून. समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – : नान्नज (ता. जामखेड) येथील युवक विठ्ठल मोहोळकर आठ दिवसांपूर्वी जामखेड येथे भीषण अपघात झाला होता. अपघातानंतर त्याला तातडीने उपचारासाठी नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. विठ्ठल मोहोळकर यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने उपचाराचा खर्च मोठे आव्हान ठरत होता. या प्रकरणाची गंभीरता ओळखून शिवसेना तालुका उपप्रमुख नितीन कोल्हे यांनी नगर येथे जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सचिव एकनाथ शेलार यांची भेट घेतली व संपूर्ण परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली. एकनाथ शेलार यांनी तात्काळ दखल घेत मंगेश चिवटे यांच्याशी संपर्क साधून संबंधित मदतकार्याला गती दिली. त्यानंतर शासकीय व प्रशासकीय…

Read More